शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

विसर्जन मिरवणूक : ३३ रुग्णांना आॅक्सिजनद्वारे जीवदान, मिनी हॉस्पिटलद्वारे ३,८०० जणांना उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:28 AM

निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेशभक्त आणि पोलिसांसाठी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये गर्दीमध्ये पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने बेशुद्ध पडलेल्या बारा जणांना वेळीच उपचार देण्यात आले.

पुणे : निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेशभक्त आणि पोलिसांसाठी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये गर्दीमध्ये पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने बेशुद्ध पडलेल्या बारा जणांना वेळीच उपचार देण्यात आले. गेल्या बारा दिवसांमध्ये उत्सवात ३ हजार ८०० हूनअधिक गणेशभक्त आणि पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.राजगुरुनगरवरून ९२ वर्षांचे वयोवृद्ध पुण्याची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात असणाºया गर्दीमुळे आॅक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना निरंजन सेवाभावी संस्थेच्या मिनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे अध्यक्ष जयेश कासट यांनी सांगितले.या हॉस्पिटलमध्ये २० डॉक्टरांसह रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. कोणत्याही सुटी अथवा सवलतीशिवाय पोलीस बंदोबस्त करीत होते. या बंदोबस्ता दरम्यान पोलीस तसेच नागरिकांना हृदयविकाराचा सौम्य झटका, दम्याचा झटका, रक्तदाब, मधुमेह, अचानक चक्कर येणे, फिट येणे, मार लागून रक्तस्राव, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा अनेक तक्रारी उद्भवल्या. त्यांचे उपचार या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. यातील ६० टक्के रुग्णांना अशक्तपणा, चक्कर येणे, रक्तदाब यांसारखे आजार होते. तर, २० टक्के रुग्णांना मधुमेह, आॅक्सिजनची कमतरता यांसारखे आजार आढळून आले. तसेच, १० टक्के रुग्ण गर्दीमध्ये गुदमरण्याची तक्रार घेऊन आले होते.

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जन