शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी माताळेंनी लावली जिवाची बाजी; पाण्यात उडी घेत ५ मुलींना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 10:41 IST

धरणा तिरावर मुलींच्या बुडण्याचा आरडाओरडा होत असल्याचा आवाज आला

पुणे - एका नातेवाईकांकडे लग्नसमारंभ आणि नामकरण कार्यक्रमानिमित्त गोऱ्हे खुर्द गावात आलेल्या बुलढाण्यातील मुली खडकवासला धरणाच्या तीरावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तिथे पाय घसरून पाण्यात पडल्या. त्यात दोन तरूणींचा मृत्यू झाला आहे, तर इतर सात जणींना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात यश आहे. खुशी संजय खुर्दे (वय १३, रा. सोळकी, जि. बुलढाणा ), शीतल भगवान टिटोरे (वय १५, रा. आंबेडझरी, ता.जि. बुलढाणा) असे बुडून मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. मात्र, या दुर्घटनेवेळी स्थानिक शेतकरी संजय माताळे आणि रमेश भामे यांनी जीवाची बाजी लावून बुडत असलेल्या इतर मुलींना वाचवले. 

धरणा तिरावर मुलींच्या बुडण्याचा आरडाओरडा होत असल्याचा आवाज आला. याच वेळी जवळच असलेल्या स्मशानभूमीत सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता. तिथे गोरेखुर्द आणि झाळणवाडी गावचे ग्रामस्थ जमले होते. त्यापैकी संजय सीताराम माताळे आणि रमेश नामदेव भामे या दोन तरुणांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेऊन सात मुलींना वर काढले. माताळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुली व एका महिलेला एक-एक करुन पाण्याच्या कडेला आणले. परंतु, दोघींना वाचवता आले नाही. "ओरडण्याचा आवाज आला तसा मी पळालो आणि पाण्यात उडी घेतली. माझ्या मागे काही लोक मदतीसाठी आले होते. पाच जणींना मी बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले व काठावर थांबलेल्यांकडे दिले,'' असे माताळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

संजय माताळे आणि रमेश भामे यांनी दाखवलेल्या धाडसाचं सध्या कौतुक होत आहे. संजय माताळे हे शेतकरी असून स्थानिक असल्यामुळे त्यांना तेथील पाण्याचा अंदाज होता. त्यामुळेच, मागेपुढे न पाहाता त्यांनी धरणात उडी घेतली, सोबतीला रमेश भामे हेही आले. या दोघांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न करत ७ मुलींना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर, तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आले. या दोघांच्या प्रयत्नामुळे ७ मुलींचा जीव वाचला. त्यामुळे, दोघांचेही कौतुक होत आहे. 

संजय नारायण लहाणे हे गोऱ्हे खुर्द गावात ग्रीन थंब संस्थेत वॉचमनचे काम करतात. खडकवासला धरण तीरावर लावलेल्या झाडांची निगराणी करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. तिथेच संस्थेने दिलेल्या झोपडीवजा घरात ते आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या नातेवाईकांचे लग्न समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त आणि एका नातेवाईकाच्या मुलाच्या बारशानिमित्त घरी काहीजण आले होते. त्या नातेवाईकांपैकी नऊ मुली धरण तीरावरील घरात राहावयास रविवारी रात्री आल्या होत्या. सोमवारी (दि.१५) सकाळी नऊच्या दरम्यान या सर्व मुली कपडे धुण्यासाठी धरण तीरावर गेल्या असता त्यातील एकीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. पाणी खोल असल्याने तिला वाचवण्यासाठी बाकीच्या सात जणींनी आरडाओरडा करत तिला धरण्याचाही प्रयत्न केला असता त्याही पाण्यात गेल्या. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले. 

यावेळी कुमुद संजय खुर्दे ( वय ७, रा. बुलढाण), पायल संजय लहाणे (वय १८, रा बुलढाणा ), शीतल अशोक धामणे (वय १६ जळगाव), राखी सुरेश मांडवे (वय १६, बुलढाणा ), पायल संतोष साळवे (वय १८, रा. सुरत, गुजरात), मीना संजय लहाणे (वय ३० बुलढाणा ), पल्लवी संजय लहाणे (वय १० बुलढाणा ) या मुलींना वाचविण्यात यश आले.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच हवेली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम आणि पोलीस हवलदार विलास प्रधान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी माहिती घेतली. तोपर्यंत अग्निशामन दलाचे प्रमुख सुजित पाटील जवानासह आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी येऊन बुडालेल्या दोन मुलींचा शोध घेतला. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे नितीन नम यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाWaterपाणीPoliceपोलिस