शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मनसेबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल :बाळासाहेब थोरात यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 21:03 IST

आघाडी तर लांब मात्र प्रचारातही सोबत नको असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल होत असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात दिले. 

पुणे :आघाडी तर लांब मात्र प्रचारातही सोबत नको असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल होत असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात दिले.  एका कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेबाबतसकारात्मक वक्तव्य करत नेतृत्वाची भूमिका बदलत असल्याचे दाखवून दिले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, थोरात यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आघाडीत असणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनसेने चांगली भूमिका बजावली असल्याचे आम्हाला मान्य  आहे असे उत्तर दिले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मनसेसोबत वाढत्या सलगीने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसचे नेतेच आता राज ठाकरे यांचे कौतुक करताना दिसत आहेत. 

याशिवाय थोरात यांनी विधासभेतही राष्ट्रवादीसोबत आघाडी कायम राहणार असल्याचे सांगितले. भाजपच्या बाजूने निकाल दाखवत असलेल्या एक्झिट पोलवर भाष्य करताना त्यांनी निकाल एक्झिट पोलपेक्षा वेगळा असेल असे म्हटले. विखे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे गटनेतापद मिळणार का याविषयी  बोलताना ते म्हणाले की, याबाबत आमची चर्चा झाली आहे, आम्हाला मतेही विचारली आहेत. याबाबत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अंतिम निर्णय घेतील. 

टॅग्स :PoliticsराजकारणMNSमनसेcongressकाँग्रेसRaj Thackerayराज ठाकरेBalasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरात