शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:11 IST

आयएमएने या प्रकरणात बोलायला नको होतं, मात्र त्यांच्या या भूमिकेने सर्व डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी डॉ घैसास यांना पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस पाठवल्यावर त्या चौकशीमध्ये घैसास निर्दोष म्हणून सिद्ध होतील. या सगळ्या प्रकरणात शासन जरी चूक कोणाची हे जरी अहवालाचा अभ्यास करून समोर आणणार असले तरी इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या सोबत असल्याचे आयएमएने सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणे चूक असून इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांची बाजू मांडली आहे. त्यानंतर आमदार अमित गोरखे यांनी या प्रकरणाबाबत आयएमएलाच इशारा दिला आहे.  डॉ घैसासांना पाठिंबा दर्शवलाय. मात्र ही बाब खेदजनक असून डॉ घैसास प्रमाणे आयएमएला रोषाला सामोरं जावं लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

अमित गोरखे म्हणाले,  तनीषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयचे डॉ सुश्रुत घैसास नाहीत. असे म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ घैसासांना पाठिंबा दर्शवला आहे. ही बाब खेदजनक असून डॉ घैसास प्रमाणे आयएमएला रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगत गोरखेंनी आयएमएचे अध्यक्ष संतोष कदामांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. मुळात कदमांनी या प्रकरणात बोलायला नको होतं. मात्र त्यांच्या या भूमिकेने सर्व डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, असे गोरखेंनी नमूद केले आहे. दुसरीकडे चौथा अहवाल रात्री मुख्यमंत्र्यांकडे सादर झाल्याचा दावा, गोरखेंनी केलाय. यात तनीषा भिसेंना न्याय मिळेल, असा विश्वास गोरखेंनी व्यक्त केला आहे.

आयएमएच्या डॉक्टरांचा घैसास यांना पूर्णपणे पाठिंबा 

डॉ घैसास यांनी गर्भवती महिलेला योग्य उपचार दिले होते. शिवाय ते देत असताना काही सूचनाही वेळोवेळी केल्या होत्या. महिलेला गर्भधारणा रिस्क असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच तुम्ही मुलं दत्तक घेण्याचा विचार करावा असा पर्यायही घैसास यांनी सुचवला होता. मात्र महिलेने अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी हे ऐकले नाही. डॉक्टरांचे न ऐकता काही निर्णय संबंधित महिलेने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतले. जेव्हा महिलेची प्रकृती सिरीयस झाली तेव्हा सुद्धा घैसास यांनी महिलेला मदत करण्याची तयारी दर्शवली होती.  डॉ. घैसास यांच्यावर पैसे मागितल्याचा जो आरोप होत आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. कौन्सिलने जरी त्यांना नोटीस पाठवली असली तरी चौकशीमध्ये ते निर्दोष म्हणून सुटतील. आम्ही महाराष्ट्र आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी घैसास यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवला असून त्यांच्या पाठीशी असल्याचे आयएमएचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ संतोष कदम यांनी यावेळी सांगितले आहे.  

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीयPoliticsराजकारणSocialसामाजिकPoliceपोलिसDeenanath Mangeshkar Hospitalदीनानाथ मंगेशकर रुग्णालय