शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मी खूप हतबल झाली आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘मी खूप हतबल झाली आहे. हे प्रकरण कसे हाताळावे कळत नाहीये. माझ्यासमोर दुसरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘मी खूप हतबल झाली आहे. हे प्रकरण कसे हाताळावे कळत नाहीये. माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने मी तुमचे लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ करीत आहे, असे सांगत उद्योजक नानासाहेब गायकवाड यांची नात आणि त्यांची मुलगी सोनाली व दीपक गवारे यांची १९ वर्षीय मुलगी राजेश्वरी हिने आई-वडिलांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला.

दि. १३ जूनला माझ्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचारासह खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. माझे सर्व कुटुंब निष्पाप असून, कुटुंबातील सदस्यांवर अन्याय केला जात आहे. माझे आई वडील दीपक आणि सोनाली गवारे यांना पोलीस अटक करून घेऊन गेले आहेत. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र पोलिसांनी सापळा रचून त्यांना चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना अटक केली. माझ्या छोट्या भावा-बहिणींची जबाबदारी माझ्यावर आली आहे. माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय उरला नसल्याने मी मदतीसाठी हा व्हिडिओ तयार केला आहे.आम्ही पोलीस, न्यायालय यांच्याशी संपर्क केला आहे. पण कोणतीच मदत मिळालेली नाही. हा व्हिडिओ अधिकाधिक सर्वापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन तिने या व्हिडिओमध्ये केले आहे.

----------------------------