शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 11, 2017 04:01 IST

पावसाळा दारात येऊन ठेपला, तरीही पालिका प्रशासनाने अद्याप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे पूर्ण केलेली नाहीत. परिणामी, शहरातील झोपडट्टीत

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पावसाळा दारात येऊन ठेपला, तरीही पालिका प्रशासनाने अद्याप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे पूर्ण केलेली नाहीत. परिणामी, शहरातील झोपडट्टीत राहणाऱ्या नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नदीपात्रातील गाळ, जलपर्णी काढण्यासह डे्रनेज सफाईची कामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासनाने दिरंगाई केली असल्यास दिसून येत आहे.जिल्हा प्रशासनातर्फे पूर नियंत्रण स्थिती व पावसाळा पूर्वतयारीसाठी महिनाभरापूर्वी आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी विभागांसह पालिका व पोलीस प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या कामांची पूर्तता करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. नदीपात्रालगत, पात्रातील झोपडपट्ट्या व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून योजना करावी. तसेच, नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढण्याचे आणि गटारसफाई करणे, औषधफवारणी, धोकादायक वृक्षांची छाटणी करणे आदी कामांसह जुन्या पुलांची व जुन्या इमारतींची बांधकामे पावसाळ्यापूर्वी करून घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.मॉन्सून काही तासांवर येऊन ठेपलेला असताना शहरातील नालेसफाईसह डे्रनेज सफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शहरातील पुलांच्या डागडुजीची कामे सुरू आहेत. पुलांच्या डागडुजीसाठी नदीपात्रात मातीचे बंधारे घालून ठेवण्यात आले आहेत. गणेश पेठेसह आणखी काही ठिकाणी डे्रनेज फुटलेल्या स्थितीत आहेत. पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे ३१ मेपूर्वी करण्याची मुदत आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत डे्रनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते उकरले जात आहेत. नदीपात्रातील झोपड्या हटविण्याबाबत हालचाली झाल्या नाहीत.उकरलेल्या रस्त्ते अद्यापही बुजविले नाहीत- शहरातील काही मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये रस्ता उकरून डे्रनेजसाठी पाईप टाक ले आहेत. मात्र, उकरलेल्या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरणे केलेले नाही. त्याचप्रमाणे रस्त्यात पडलेले खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. - पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यातील सर्व पुलांची, जुन्या इमारतींची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, रस्त्यांच्या साईडपट्ट्या भरून घेणे आवश्यक आहे. खेड-शिवापूर येथील घटनेची पूनरावृत्ती होऊ नये, यासाठी रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार करावेत.आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे विविध विभागांकडून केली जात आहेत. काही विभागांनी कामाची पूर्तता झाली असल्याचे कळविले आहे; परंतु नालेसफाई, डे्रनेज सफाई, जलपर्णी काढणे आदी कामे सुरू आहेत. नियंत्रण कक्षामध्ये नोडल आॅफिसरची नेमणूक केली आहे.- गणेश सोनुने, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन, पुणे महापालिका