शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"गावात दवाखाना चालवायचा असेल तर २५ हजार महिना द्यावा लागेल, अन्यथा.." ; माजी सरपंचावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 20:39 IST

फिर्यादी हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचा शिक्रापूर गावात दवाखाना आहे..

ठळक मुद्देशिक्रापुरच्या माजी सरपंचाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

शिक्रापूरशिक्रापूर (ता .शिरूर) येथे दवाखाना चालवायचा असेल तर महिन्याला २५ हजार रुपये द्यावे लागेल. नाहीतर दवाखाना चालू देणार नाही. तसेच तुझ्याविरुद्ध खोटया तक्रारी दाखल करू, असे धमकावून पैसे मागितल्याप्रकरणी शिक्रापुरच्या माजी सरपंचाविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रामेश्वर बंडगर (मुळ रा.सोईट, पो.धानोरा, ता.उमरखेड, जि.यवतमाळ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

विशेष म्हणजे ज्या डॉक्टरने सासवडे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली त्यांचेच अपहरण करण्यात आले होते. शिक्रापूर पोलिसांनी या डॉक्टरला पुण्यातून ताब्यात घेतले. फिर्याद मागे घ्यावी म्हणून त्यांचे अपहरण करुन त्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी सासवडे यांच्यासह शाम सासवडे, सुभाष सांडभोर, गणेश लोखंडे आदी एकुण चौघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी मयुर वैरागकर यांनी दिली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (वय २८, रा. माळीमळा शिक्रापूर, ता. शिरूर) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचा शिक्रापूर गावात दवाखाना आहे. १० दिवसांपूर्वी २४ ऑक्टोबर रोजी शिक्रापूर गावचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी रामेश्वर बंडगर यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले व तुला शिक्रापूर गावाच्या हद्दीत हॉस्पिटल चालवायचे असेल तर महिन्याला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर दवाखाना चालू देणार नाही, तसेच खोटया तक्रारी दाखल करू असे म्हणून पैसे मागितले. 

दरम्यान, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी बंडगर हे घरी निघाले असताना सुभाष सांडभोर यांनी त्यांना बोलावून घेत शाम सासवडेने त्यांना धमकावले व गणेश लोखंडेसह पुण्यातील एका हॉटेलात डांबून ठेवले. ही माहिती बंडगर यांनी तपास अधिकारी वैरागकर यांना मेसेज टाकून कळविल्यावरुन मयुर वैरागकर व पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी तात्काळ पावले उचलत ही कारवाई केली. 

 

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलsarpanchसरपंच