शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी रेल्वेखाली जीव देईल', असे घाबरवून १७ वर्षीय मुलीला प्रेम करण्यास भाग पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:32 IST

मुलीचा छळ करून विनयभंग करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देमुलीच्या वडिलांनी कुटुंबियांच्या जीवास धोका असल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली

लोणी काळभोर : 'माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी रेल्वेखाली जीव देईल' असे घाबरवत मुलीचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादी वरून पुष्कर कोतवाल ( वय २०, रा. कुंजीरवाडी ता.हवेली ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुलगी आणि तरुण एकाच हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होते. तो तीला कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देत असे. तिच्याकडे सतत बघणे, दुस-यामार्फत तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार करत असे. परंतु मुलगी त्याकडे दुर्लक्ष करत होती.

२०१८ मध्ये ती बडमिंटन खेळण्यासाठी गेल्यावर पुष्करने तिचा पाठलाग करुन तिच्या सोबत प्रेम करीत असल्याचे सांगितले. त्यावेळी ती घाबरुन निघून चालली होती. त्याच क्षणी टोकदार वस्तूने डाव्या हातावर कापून घेत 'तू जर माझ्यावर प्रेम नाही केले, तर मी रेल्वे अथवा ट्रकखाली जाऊन आत्महत्या करेल'. असे म्हणत तिला भेटण्यास व बोलण्यास भाग पाडले होते. तसेच तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याने तिच्यासोबत फोटो काढले. तिच्या इन्स्टाग्राम व स्नॅपचॅट सोशल मिडीयाचा पासवर्ड बळजबरीने मागून घेतला. मुलीला एकांतात भेटण्यास बोलावून विनयभंग केला.           यासंदर्भात मार्च २०२१ मध्ये तिने कुटुंबियांना विश्वासात घेऊन पुष्करबद्दल सर्व घरी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी पुष्करच्या घरी जाऊन त्याच्या  कुटुंबियांना झालेल्या प्रकाराबाबत सांगितले होते. त्यानंतरही तो आय मिस यु अशा प्रकारचे वारंवार ई-मेल पाठवुन त्रास दिला. १० जुलैला मुलगी आपल्या कुटुंबियांसमवेत पुणे-  सोलापुर महामार्गावरील कुंजीरवाडी गावच्या हद्दीतील आईसक्रिम पार्लर येथे गेली असता तेथेही तिचा पाठलाग केला. त्यावेळी ती आणि कुटुंबीय सर्वजण घाबरून गेले होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी कुटुंबियांच्या जीवास धोका असल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिलाEducationशिक्षण