शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

"आगामी निवडणुकांमध्ये राजकीय नुकसान टाळायचं असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत युती करण्याची आवश्यकता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 16:59 IST

आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत युती करण्याची आवश्यकता पुणे महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येणार

पुणे : पुणे महापालिकेची पंचवार्षिक निवडणुक आम्ही भाजपसोबतच लढणार आहोत. पुन्हा आमचीच सत्ता येईल असे भाकीत केंद्रीय समाजकल्याणमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वर्तविले आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळे लढले‌ तर आम्ही त्यांच्यावर मात करू असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

रामदास आठवले हे शुक्रवारी (दि. १६) पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.  

आठवले म्हणाले, राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. आगामी पालिका निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढविली जाईल. मात्र, विधानसभा आमच्या चिन्हावर लढविण्याचा प्रयत्न आहे. भाजपाच्या‌ सहकार्याने रिपाइंला उपमहापौरपद मिळाले. 

पुण्याचा विस्तार होत असून, ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. -----'नो कोरोना'... आठवलेंचा नवा नारामी गो कोरोनाचा नारा दिला होता. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. आता, 'नो कोरोना नो कोरोना'चा नारा देत असल्याचे आठवले म्हणाले.-----दुसरी महापालिका करापालिकेच्या हद्दीत २३ गावे समावेश केल्याने शहराचे क्षेत्र वाढल्याने दुसरी महापालिका करावी. राज्य‌ सरकारने पुण्यासाठी साडेचार एफएसआय द्यावा. जेणेकरून बिल्डर एसआरएसाठी पुढे येतील आणि झोपडपट्टी धारकांना फायदा मिळेल.------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना