शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र लढलो असतो तर महाविकास आघाडीला ६७ जागा मिळाल्या असत्या; प्रशांत जगताप यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:09 IST

महायुतीतील घटक पक्षाला मतदान करायचे असेल तर मग भाजपलाच मतदान केलेले काय वाईट ही लोकांची मानसिकता होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने लोकांनी भाजपलाच मतदान केले

पुणे : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो असतो तर वेगळा निकाल लागून महाआघाडीला ५४ ते ६७ जागा जिंकून आल्या असत्या. भाजपला सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुणेकरांनी महाविकास आघाडीला मतदान केले असते, असा दावा काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद केला. मी ज्यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले त्यावेळी मला काँग्रेसमध्ये घेऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

जगताप म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा (शरद पवार) शहराध्यक्ष असताना भाजपविरोधात शहरस्तरावर चांगली मोट बांधली होती; परंतु काही जणांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीमधून लढलो तर पक्षाचे चाळीसच्या आसपास नगरसेवक निवडून येतील आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर पक्षाचे तीन ते आठ नगरसेवक निवडून येतील. महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले लोकांना आवडणार नाही, हे मी काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वीच सांगितले होते. महायुतीतील घटक पक्षाला मतदान करायचे असेल तर मग भाजपलाच मतदान केलेले काय वाईट ही लोकांची मानसिकता होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने लोकांनी भाजपलाच मतदान केले.’

काँग्रेस कधीच भाजपसोबत जाणार नाही हे माहीत होते. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये गेलो. काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही मी माझे सहकारी असलेले ७ नगरसेवक निवडून आणले. त्यांना तेही जमले नाही. आपल्या वाटचालीत कोणी अडथळा निर्माण केला हे समोर येईल, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maha Vikas Aghadi could have won 67 seats, claims Jagtap.

Web Summary : Prashant Jagtap claims Maha Vikas Aghadi could have secured 67 seats if they fought Pune's election together. He alleges attempts to block his Congress entry, criticizing Nationalist Congress Party's strategy for benefiting BJP.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती