शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचा पाठिंबा तर मग त्यांना मुख्यपद का नाही? अतुल लोंढे; इव्हीएम आंदोलन देशस्तरावर नेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:21 IST

बॅलेटवर मतदान घेण्याचा सोलापूरमधील मारकरवाडीतील ग्रामस्थांचा प्रयोग सरकारने दडपशाही करून हाणून पाडला, असा आरोप त्यांनी केला.

पुणे : सत्ताधारी म्हणतात राज्यातील ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केले तसे आहे तर मग मुख्यमंत्री नाही तर दोनपैकी एका पदावरतरी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व का दिले नाही, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. बॅलेटवर मतदान घेण्याचा सोलापूरमधील मारकरवाडीतील ग्रामस्थांचा प्रयोग सरकारने दडपशाही करून हाणून पाडला, असा आरोप त्यांनी केला.लोंढे व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी मारकडवाडीला भेट दिली व तेथील ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. त्यानंतर पुण्यात पत्रकारांबरोबर बोलताना लोंढे यांनी सरकारने त्या गावावर जबरदस्ती केल्याचे सांगितले.

माजी नगरसेवक अजित दरेकर यावेळी उपस्थित होते. पराभूत उमेदवाराला आमच्या गावातून इतकी मते पडणारच नाहीत, असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू केली. सरकारने त्याला विरोध केला. गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, असे ग्रामस्थांनी सांगितले असल्याची माहिती लोंढे यांनी दिली. सरकार अशीच दडपशाही करणार असेल तर काँग्रेसही त्याचा प्रतिकार करेल, मारकरवाडीतील ग्रामस्थांचा लढा देशपातळीवर नेण्यात येईल, असे ते म्हणाले.पराभूत झालेल्यांबरोबरच विजयी झालेल्यांचाही या निकालावर विश्वास नाही. जनतेचा तर नाहीच नाही. त्यामुळेच ठिकठिकाणी मतदारच असा निकाल लागणे शक्यच नाही, असे म्हणत आहेत असे लोंढे यांनी सांगितले. त्यामुळेच काँग्रेसने आता इव्हीएम विरोधात देशस्तरावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे लोंढे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOBCअन्य मागासवर्गीय जातीMahayutiमहायुतीcongressकाँग्रेस