शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

Pune News: पाऊस वाढल्यास विसर्गात पुन्हा वाढ होणार; पुण्यातील धरणांबाबत प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:25 IST

पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी म्हटलं आहे.

Pune Rain Update ( Marathi News ) : पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांची चांगलीच दैना झाल्याचं पाहायला मिळालं. पुणे शहरातील बहुतांश भागांमध्ये काल पाणी शिरलं होतं. अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या होत्या आणि रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं. धरणांमधून अचानक विसर्ग करण्यात आल्याने ही स्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे. अशातच पुणे शहरापासून जवळच असलेल्या तीन धरणांबाबत आज प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सकाळी ७ वाजता १३ हजार ९८१  क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असं आवाहन खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे, यांच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात होणारा विसर्ग कमी करून १२० क्युसेक करण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कासारसाई धरणाच्या सांडव्यातून  नालापात्रात विसर्ग कमी करून १२०  क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाचा अंदाज आणि धरणातील येवा लक्षात घेता विसर्ग कमी किंवा अधिक करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक अभियंता-श्रेणी १, खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक २, पुणे यांनी दिली आहे.

शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पुणे जिल्ह्यात बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, १५ जनावरे दगावली; तर, मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात तसेच लवासा येथे दरड कोसळली. बचावकार्यासाठी लष्कर तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. खडकवासलामधून होणारा विसर्ग नियंत्रित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे एका दिवसात तब्बल अडीच टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे, तर खडकवासला धरण काठोकाठ भरल्याने गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल एक टीएमसी पाणी सांडव्यातून सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुमारे चार हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसkhadakwasala-acखडकवासलाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर