शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

नियम मोडल्यास वाहतूक शाळेत धडे, मॉडेल कॉलनीत ट्रॅफिक पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 4:22 AM

 वाहतुकीचे नियम सातत्याने मोडणाऱ्या वाहनचालकांची पुणे शहरात मोठी संख्या आहे़ त्यांना वाहतूक नियमांची माहिती नसल्याने अनेकदा त्यांच्याकडून नियम मोडला जातो, अशांना आता वाहतूक शाळेत जाऊन या नियमांची पुन्हा माहिती करून घेऊन उजळणी करावी लागणार आहे.

पुणे -  वाहतुकीचे नियम सातत्याने मोडणाऱ्या वाहनचालकांची पुणे शहरात मोठी संख्या आहे़ त्यांना वाहतूक नियमांची माहिती नसल्याने अनेकदा त्यांच्याकडून नियम मोडला जातो, अशांना आता वाहतूक शाळेत जाऊन या नियमांची पुन्हा माहिती करून घेऊन उजळणी करावी लागणार आहे़ मॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिकेत ट्रॅफिक पार्क उभारण्यात आले असून, या ठिकाणी लवकरच अशी शाळा सुरूकरण्यात येणार आहे़शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि मर्यादित रस्ते यामुळे रस्त्यांवर गर्दीच्या वेळी वाहतूककोंडी ही ठरलेली आहे़ त्यामुळे अनेकांकडून सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे यापासून छोट्या-मोठ्या नियमांचा सातत्याने भंग केला जातो़ अनेकांचा नियम मोडण्याचा उद्देश नसतो; परंतु त्यांना आपण नियम मोडला आहे, याची माहितीच नसते़ अशांसाठी तसेच शालेय मुलांना वाहतूक नियमांची माहिती करून देण्यासाठी चित्तरंजन वाटिकेत ट्रॅफिक पार्क उभारण्यात आले आहे़ याठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे फलक लावण्यात आले आहेत़ सिग्नलही बसविण्यात आले आहेत़ त्यावरून नागरिकांना वाहतूक नियमांची उजळणी करता येऊ शकते़मॉडेल कॉलनी परिसर सुधार समिती, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी आणि गॅलेंट्री मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने वाहतूक ट्रेनिंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे़ या संस्थेच्या सचिव शामला देसाई यांनी याबाबत सांगितले की, आमच्या भागातील दीप बंगला चौकात होणाºया वाहतूककोंडीतून आमचे या समस्येकडे लक्ष गेले़ नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीच्या वतीने २ ते ९ आॅक्टोबर दरम्यान आम्ही शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविली़ त्यात काही पोलीस चौक्यांमध्येही साफसफाई करण्यात आली़ चित्तरंजन वाटिकेमध्ये महापालिकेच्या सहकार्याने ट्रॅफिक पार्क उभारण्यात आले आहे़ याच ठिकाणी ट्रेनिंग सेंटरही आहे़ आम्ही जेव्हा लोकांची चर्चा केली, तेव्हा अनेकांनी आपण एजंटामार्फत वाहनचालक परवाना मिळविल्याचे सांगितले़कशी असेल ही शाळा?वाहतूक नियमांची माहिती करून घेण्यासाठी या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत़ येथे येणाºया लोकांनी त्याची माहिती घ्यावी़ वाहतूक पोलिसांकडे अपघात कशामुळे घडले, का घडले याची माहिती देणाºया अनेक छोट्या छोट्या फिल्म आहेत़ येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये लोकांना साधारण अर्धा तास या फिल्म दाखविण्यात येतील़ त्यानंतर त्यांना एक प्रश्नपत्रिका दिली जाईल़ त्याची त्यांनी त्यावर उत्तरे द्यायची आहेत़ त्यातून त्यांना काय समजले हे लक्षात येईल़या प्रश्नपत्रिकेच्या शेवटी ‘यापुढे मी वाहतूक नियमांचे पालन करेऩ नियमभंग करणार नाही़’ अशी शेवटी एक प्रतिज्ञा असेल़लोकांनी नियमांची माहिती करून घेऊन आपल्या वाहन चालविण्यात त्यानुसार बदल करावा़ त्यामुळे सध्या पुणेकर वाहतूक नियमभंग केल्याने जो कोट्यवधींचा दंड भरतात़, तो त्यांना भरावा लागू नये व यातून वाहतूक शिस्त वाढावी असा प्रयत्न आहे़यासाठी वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य असणार असून, येथे येणाºया लोकांना ते नियम समजावून सांगून फिल्म दाखवणार आहेत़सुरुवातीला रोटरी, लायन्स क्लबच्या सहकार्याने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे़ शाळांतील मुलांनी याची माहिती करुन घ्यावी यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत़लोकांना नियमांची माहिती नसल्याने ते मोठ्या वाहनांना डाव्या बाजूने ओव्हरटेक करतात, त्यातून अपघात घडल्याचे अनेकदा दिसून आले आहे़ कोणालाही विनाकारण नियम मोडायचे नसतात; पण माहितीच नसल्याने अनेकांकडून नियमभंग केला जातो़ अशासाठी आपण ट्रेनिंग सुरू करावे, असा विचार आम्ही सुरू केला़ त्याला पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी तत्काळ प्रतिसाद दिला़ एक नाही तर शहराच्या चारीही बाजूंना असे सेंटर सुरू करण्याची सूचना केली़कायद्यातीलतरतूद पाहून निर्णयवाहतूक नियमांची माहिती करून देऊन वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचा हा उपक्रम चांगला आहे़ वाहतूक नियमांचे भंग करणाºया वाहनचालकांना या ठिकाणी जाऊन नियमांची माहिती घेणे बंधनकारक करता येईल का? याविषयी कायद्यातील तरतुदी पाहून निर्णय घेणार आहे़ वाहनचालकांना नियमांची पुरेशी माहिती नसल्यानेच त्यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर भंग केला जातो, हेही तितकेच खरे आहे़अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखाकोणालाही शिक्षा अथवा दंड झालेला आवडत नाही़ नियमांची पुरेशी माहिती नसल्याने दंड होऊ नये, यासाठी आम्ही हे ट्रेनिंग सेंटर सुरू करीत आहोत़ ही शाळा कोणालाही शिक्षा वाटू नये, तर त्यामुळे वाहन चालविताना स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घेतली जावी, हा उद्देश आहे़- श्यामला देसाई

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPuneपुणे