शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पाण्याचे राजकारण केल्यास त्यांना उघडे पाडू  : गिरीश बापट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:18 IST

पाणी हे नैसर्गिक संकट आहे. त्यावर कोणीही राजकारण करु नये..

ठळक मुद्देपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, असे आश्वासननिवडणुकीनंतर पाणी कपात चालू होणार नाहीभाजपाने विकासकामांवर लक्ष केंद्रित केले

पुणे : आपल्या भागात पुरेसा पाऊस पडला तर पाण्याचा प्रश्न उरत नाही. यावर्षी १९-२० टक्के कमी पाऊस पडला, याला पालकमंत्री जबाबदार नाहीत. यंदा धरणे भरल्यावर २१ टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात आले. मात्र, परतीचा पाऊस व्यवस्थित झाला नाही. पाणी हे नैसर्गिक संकट आहे. त्यावर कोणीही राजकारण करु नये. यावर कोणी राजकारण केल्यास आम्ही त्यांना उघडे पाडू, अशा शब्दांत भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी विरोधकांवर निशाणा साधला. येत्या जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यावर पुन्हा पाणी कपात होईल, या प्रचारात देखील तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  बापट (दि. ९) यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, शिवसेनेचे प्रशांत बधे आदी यावेळी उपस्थित होते. ‘‘राज्याच्या राजकारणातून दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बापटांना खासदारपदाची उमेदवारी दिली’’, असा आरोप कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘लोकमत’च्याच व्यासपीठावर केला होता. त्याचे खंडन करताना बापट म्हणाले, की इतर काहीच मुद्दे न मिळाल्यास स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे पहायचे वाकून, अशी प्रवृत्ती काहीजणांमध्ये असते. त्यातूनच असे बालिश आरोप केले जातात. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. मी त्यांच्या आधीपासून निवडणूक लढवतो आहे. ज्या पक्षाचे आयुष्य कुरघोडी करण्यात गेले, त्यांनी असे आरोप करणे हास्यास्पद आहे.कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीच स्थिती दयनीय झाली असल्याचा दावा बापट यांनी केला. ‘‘कॉंग्रेसला पुण्यात उमेदवार नव्हता. राष्ट्रवादीला मावळात उमेदवार मिळाला नाही. शिरुरमध्ये कॉंग्रेस आघाडीकडे उमेदवार नव्हता. राष्ट्रवादी हा पक्ष तर केवळ पवार कुटुंबापुरता उरला आहे,’’ असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-रिपाई महायुती पुणे जिल्ह्यातल्या चारही जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.  बापट म्हणाले, की गेल्या पाच वर्षांच्या काळात यापुर्वी कधी नव्हे इतका निधी राज्य सरकारने पुण्यासाठी दिला. चांदणी चौकातील पुलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९५ कोटी रुपये एका झटक्यात पुणे महानगरपालिकेला दिले. पुणे महापालिका एवढी वर्षे विरोधकांच्या हातात होती. मात्र त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडवला. आता मेट्रोची कामे जलदगतीने होत असल्याचे पुणेकर पाहात आहेत. 

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPoliticsराजकारणBJPभाजपाgirish bapatगिरीष बापट