शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी जर परवानगी नाकारली तर रस्त्यावर घेऊ; पण येत्या ३० जानेवारीला एल्गार परिषद होणारच! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 16:05 IST

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची घोषणा

पुणे : धर्म, जाती याऐवजी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांवर राजकारण फिरावे, या हेतूने आम्ही काम करत आहोत, हा संदेश देशभर जावा, या उद्देशाने एल्गार परिषद आयोजित केली होती. परंतु, ब्राम्हण्यवाद्यांनी या परिषदेला बदनाम केले. पण, आम्ही मागे हटणार नाही, येत्या ३० जानेवारी रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जर पोलिसांनी परवानगी नाकारली तर आता आम्ही रस्त्यावर ही परिषद घेऊ, असे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषदेचे पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आता एल्गार परिषदेच्या नव्या तारखेची पत्रकार परिषदेत घोषणा केली. कोळसे पाटील यांनी सांगितले की, पाकिस्तान, राष्ट्रवाद, लव्ह जिहाद हे आमचे प्रश्न नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांपासून ब्राम्हण्यवादी आणि भांडवलवादी आम्हाला दूर ठेवतात. हे सर्वदूर जावे. तसेच भीमा कोेरेगावच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एल्गार परिषदेचे ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजन केले होते. या परिषदेचा आणि नक्षलवाद्यांचा काही संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंध जोडण्यात आला. मानवतावादी कार्य करणाऱ्या अनेकांना अटक केली. त्यातील सुधीर ढवळे, शोमा सेन वगळता कोणाचाही एल्गार परिषदेशी संबंध नव्हता. तसेच या परिषदेला नक्षलवाद्यांचा कोणताही पैसा लागला नव्हता. असे असताना वेगवेगळे आरोप करुन एल्गार परिषदेला बदनाम करण्यात आले. 

एल्गार परिषदेतून देशभरात संदेश गेला होता. आमची विचाराशी बांधिलकी आहे. त्या हेतूनेच आता ३० जानेवारीला एल्गार परिषद घेत आहोत, असे कोळसे पाटील यांनी सांगितले.

यावेळी लाल सेनेचे गणपत पिसे, बहुजन एकता परिषदेचे किशोर कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. एल्गार परिषदेला राज्यातील २५० संघटनांचा पाठिंबा आहे. ३० जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि रोहित वेमुला याचा वाढदिवस आहे. त्यादिवशी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत देभरातील मानवतावादी नेते या परिषदेला मार्गदर्शन करतील, असे आकाश साबळे यांनी सांगितले.

बी. जी. कोळसे पाटील यांचे पत्रकार परिषदेतील मुद्दे : 

* माझ्याविरुद्ध सर्च वॉरंट घेण्याचा प्रयत्न झाला होता. पण तो यशस्वी झाला नाही. एनआयएसह अनेक संस्थांनी तपासणी केली. त्यांना काही हाती लागले नाही.* शनिवारवाड्यावर दुसऱ्या दिवशी असलेल्या कार्यक्रमासाठीचा मंच तयार होता. त्यावरच आम्ही एल्गार परिषद घेतली. त्यासाठी एका पैशाचाही खर्च आला नाही.

* ट्रकवर उभे राहून आम्ही सभा घेतल्या आहेत.* काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षानेच आपल्याला तीन वेळा अटक केली होती.

* एल्गार परिषदेनंतर फडणवीस सरकारने आपल्याला पोलीस संरक्षण दिले होते. महाविकास आघाडीचे सरकार येताच ते संरक्षण काढून घेतले गेले.* सरकार कोणाचेही आले तरी सर्व सरकारी संस्था मनुवादी विचारांनी ग्रासलेल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाPoliceपोलिसBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारState Governmentराज्य सरकार