शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले तर ‘१००’ नंबर डायल करा; डॉ. के. व्यंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 12:37 IST

कंटन्मेंट झोन वगळता पुणे शहरात सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी

ठळक मुद्देनियोजित वेळेत दुकाने बंद करण्याबाबतचे कुठलेही आदेश पोलिस यंत्रणेला दिले नसल्याचे स्पष्ट

पुणे : कंटन्मेंट झोन वगळता पुणे शहरात सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिलेली आहे़. त्यामुळे या वेळेत पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितल्यास, दुकानदारांनी थेट ‘ १००’ नंबर डायल करावा व संबंधित पोलिसांची तक्रार करावी़ असे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. पुणे शहरात पुणे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, कंटन्मेंट झोन वगळता अन्य भागातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. असे असताना सुध्दा उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी, दुकानदारांंना दुपारीच दुकाने बंद करण्याबाबत जबरदस्ती करीत आहेत. याबाबत मध्यंतरी काही दुकानदारांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणूनही दिली होती. तेव्हा महापालिका आयुक्तांनी पोलिस आयुक्तांशी बोलून, पोलिस यंत्रणेकडून दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे सांगितले होते. तसेच सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने बंद करण्यात येऊ नये असेही स्पष्ट केले होते. पंरतु, अद्यापही स्थानिक पातळीवर पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी दुकानदारांना दुकाने बंद करण्याबाबत जबरदस्ती करीत असून, तसे न केल्यास कायदेशीर कारवाईची भितीही घालत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे स्पष्ट करून, नियोजित वेळेत दुकाने बंद करण्याबाबतचे कुठलेही आदेश पोलिस यंत्रणेला दिले नसल्याचे स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टसिंगचे पालन करून, प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत दुकाने उघडी असतील, व या ठिकाणी कोणी पोलिस अधिकारी अथवा कर्मचारी दुकान बंद करण्याची जबरदस्ती करीत असेल तर संबंधित दुकानदाराने थेट १०० नंबर डायल करून तक्रार करावी असे सांगितले आहे. ---------------------------

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त