शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 1:14 PM

साखर कारखान्यांसाठी अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना 

ठळक मुद्देअखेर ऑक्सिजन निर्मिती, वितरण आणि पुरवठ्यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण ठेवण्यास सुरुवात

पुणे : जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर ऑक्सिजनची मागणी वाढल्याने उद्योग धंद्याचा ऑक्सिजन पुरवठा कमी करण्यात आला. परंतु 15 ऑक्टोबरनंतर पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व साखर कारखाने सुरू होणार असल्याने सध्या देखभाल दुरूस्तीची कामे सुरू आहेत. यात ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी ही कामे रखडली आहेत. यामुळेच आता पॅनिक सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील यांची दक्षता घ्या , अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.      पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत देखील अचानक मोठी वाढ झाली. यामुळे औद्योगिक वापराचा ऑक्सिजन पुरवठा कमी करून तब्बल 90 टक्के ऑक्सिजन पुरवठा मेडिकल वापरासाठी राखीव ठेवण्यात आला. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या एकूण ऑक्सिजन पैकी 80 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर केवळ 20 टक्केच मेडिकल वापर होत होता. परंतु कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांत ही परिस्थिती उलटी झाली आहे. त्यात काही हाॅस्पिटलला ऑक्सिजन पुरवाठा होत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. अखेर ऑक्सिजन निर्मिती, वितरण आणि पुरवठ्यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली.     याबाबत जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत पवार यांनी काही साखर कारखान्यांनी ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने देखभाल दुरूस्तीची कामे रखडली असल्याची तक्रार केली आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली असले तर उत्पादन वाढविण्यावर देखील भर द्या. उद्योग-धंदे पण चालू राहिले पाहिजेत. यामुळे मेडिकल आणि औद्योगिक ऑक्सिजन पुरवठ्यात समतोल राखण्याच्या सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या