'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:14 PM2020-09-19T13:14:28+5:302020-09-19T13:14:39+5:30

साखर कारखान्यांसाठी अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना 

If the 'panic' situation is reduced, take care to ensure smooth supply of oxygen to the industry | 'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या 

'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या 

Next
ठळक मुद्देअखेर ऑक्सिजन निर्मिती, वितरण आणि पुरवठ्यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण ठेवण्यास सुरुवात

पुणे : जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर ऑक्सिजनची मागणी वाढल्याने उद्योग धंद्याचा ऑक्सिजन पुरवठा कमी करण्यात आला. परंतु 15 ऑक्टोबरनंतर पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व साखर कारखाने सुरू होणार असल्याने सध्या देखभाल दुरूस्तीची कामे सुरू आहेत. यात ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी ही कामे रखडली आहेत. यामुळेच आता पॅनिक सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील यांची दक्षता घ्या , अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.
      पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत देखील अचानक मोठी वाढ झाली. यामुळे औद्योगिक वापराचा ऑक्सिजन पुरवठा कमी करून तब्बल 90 टक्के ऑक्सिजन पुरवठा मेडिकल वापरासाठी राखीव ठेवण्यात आला. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या एकूण ऑक्सिजन पैकी 80 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर केवळ 20 टक्केच मेडिकल वापर होत होता. परंतु कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांत ही परिस्थिती उलटी झाली आहे. त्यात काही हाॅस्पिटलला ऑक्सिजन पुरवाठा होत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. अखेर ऑक्सिजन निर्मिती, वितरण आणि पुरवठ्यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली. 
    याबाबत जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत पवार यांनी काही साखर कारखान्यांनी ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने देखभाल दुरूस्तीची कामे रखडली असल्याची तक्रार केली आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली असले तर उत्पादन वाढविण्यावर देखील भर द्या. उद्योग-धंदे पण चालू राहिले पाहिजेत. यामुळे मेडिकल आणि औद्योगिक ऑक्सिजन पुरवठ्यात समतोल राखण्याच्या सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Read in English

Web Title: If the 'panic' situation is reduced, take care to ensure smooth supply of oxygen to the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.