शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मोदीजींनी सांगितलं तर वाघाशीही दोस्ती करू, चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला थेट 'ऑफर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 20:11 IST

उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले..

पुणे : भाजप बरोबरचा घरोबा संपवून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. हा घाव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. तेव्हापासून भाजप आणि शिवसेनेत सातत्याने आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. मात्र, काल दिल्लीत उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात विशेष बैठक झाली अन् राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क- वितर्कांना उधाण आलं. मात्र, शिवसेनेवर टीका करण्यात आघाडीवर असणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नरेंद्र मोदींनी आदेश दिले तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू असे सांगत एकप्रकारे शिवसेनेलाच थेट 'ऑफर' दिली आहे.

पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांना वाघाची प्रतिकृती भेट दिली. त्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले, आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसेच फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचं म्हणणं आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर १८ महिन्यांपूर्वीच सरकार आलं असतं.  मात्र,मोदीजींनी सांगितलं तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. आणि नेत्याचा आदेश म्हटल्यावर आम्ही वाट्टेल तर करू. पण जरी तसं काही घडलं तरी निवडणुका ह्या वेगळ्याच लढविल्या जाणार आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारची मराठा आरक्षणावरून धूळफेक 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेल्या भेटीवर आणि केलेल्या मागण्यांसंबंधी देखील पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले,राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक सुरु आहे. केंद्र सरकारच्या हातात मराठा आरक्षणासंबंधी काहीच नाही. मात्र, राज्य सरकारला समिती स्थापन करून प्रचंड सर्व्हे करून सर्वात अगोदर मराठा समाजाला मागास ठरविण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. याच दरम्यान,राज्य सरकारने भाजपच्या सत्ताकाळात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ज्या सवलती दिल्या होत्या त्या तरी द्यायला हव्यात. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने तुमचे हात कुठे बांधलेत ? असे मत पाटील यांनी व्यक्त केले,

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी