शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नरसिंह राव यांनीही प्रचारात अणुस्फोट केला असता तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 6:56 AM

आचारसंहितेचा भंग यामध्ये झालेला नाही, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला असला, तरी लोकशाहीचे संकेत म्हणून मोदी यांनी संयम पाळायला हवा होता, असे म्हटले जाते

प्रशांत दीक्षित 

पुणे : लोकसभा निवडणूक प्रचार सुरू असतानाच मिशन शक्तीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे बरेच वादंग सुरू आहेत. उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेला जगातील चौथा देश अशी भारताची नवी ओळख करून देणारी ही घोषणा पंतप्रधानांनी स्वत: करणे हा आचारसंहितेचा भंग असल्याची टीका विरोधकांनी केली.

आचारसंहितेचा भंग यामध्ये झालेला नाही, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला असला, तरी लोकशाहीचे संकेत म्हणून मोदी यांनी संयम पाळायला हवा होता, असे म्हटले जाते. निवणडणूक प्रचाराच्या काळात अशी लक्षवेधक घोषणा करून जनमतावर प्रभाव टाकण्याची संधी १९९६ मध्ये नरसिंह राव यांनाही होती; पण त्यांनी तसे केले नाही. तसे त्यांनी का केले नाही हे एक गूढ आहे. नरसिंह राव यांच्या चरित्रकारांनी अणुचाचणीसाठी रावांनी केलेल्या तयारीवर बरीच माहिती दिली असली, तरी या गूढ रहस्यावर त्यांनाही प्रकाश टाकता आलेला नाही.

१९९१मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्या वेळी सोने गहाण ठेवण्याइतकी वाईट स्थिती असूनही रावांनी अणुकार्यक्रम सुरू ठेवला.. अणुबॉम्बची पाकिस्तानची तयारी आणि अण्वस्त्र प्रसारबंदी करारानुसार भारताची अमेरिकेसह पाच बड्या राष्ट्रांकडून होत असलेली नाकेबंदी यातून मार्ग काढण्यासाठी लवकरात लवकर अणुस्फोट करून अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून भारताची जगाला ओळख करून देणे आवश्यक होते. अणुऊर्जेचे अन्यही अनेक फायदे घेता येणार होते.

याचवेळी भारताने अण्वस्त्र बनविण्याचा कार्यक्रम गुप्तपणे हाती घेतला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली १९७२मध्ये भारताने अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला असला, तरी क्षेपणास्त्र वा विमानावर अणुबॉम्ब चढवून त्याचा लांबवर मारा करण्याचे तंत्रज्ञान हाती आले नव्हते. पृथ्वी व अग्नी क्षेपणास्त्रे बनविल्यावर १९९४-९५मध्ये ते हाती आले. त्याच दरम्यान मिराज-२००० (अभिनंदन वर्धमान यांनी प्रसिद्ध केलेले विमान) या विमानावर लहान अणुबॉम्ब ठेवून त्याचा अचूक मारा करण्याची चाचणीही यशस्वीपणे घेण्यात आली. अर्थात, या बॉम्बमध्ये प्लुटोनियमचा वापर करण्यात आला नव्हता. या प्रगतीमुळे १९९५च्या शेवटापर्यंत अणुबॉम्बची पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता पडली.अणुबॉम्बची चाचणी घेण्याचा आदेश नरसिंह राव यांनी १९९५च्या नोव्हेंबरमध्ये दिला. त्यानंतर डीआरडीओने अतीगोपनीय टिपण तयार केले. त्यानुसार डिसेंबरमध्ये अणुचाचणी घेण्याचे ठरले. १९ डिसेंबर हा दिवस मुक्रर झाला.

१५ डिसेंबरला अचानक ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये भारत अणुचाचणीची तयारी करीत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली व चाचणी थांबविण्यात आली. अमेरिकेच्या उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे पंतप्रधान कार्यालयात पाठविली. अणुचाचणीपासून रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष क्लिंटन यांनी मोठा दबाव आणला. हा दबाव लक्षात घेऊन लोकसभेत परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी निवेदन करून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ची बातमी खोटी असल्याचे सांगितले. मात्र, अणुचाचणीची माहिती मुखर्जींपासूनही गुप्त ठेवण्यात आली होती. त्यांनी फक्त सांगितल्यानुसार निवेदन केले. अर्थमंत्री मनमोहनसिंग हेही अनभिज्ञ होते. फक्तअण्वस्त्र कमिटीला याबाबत माहिती होती. क्लिंटन यांचा दबाव राव यांनी मानला; पण आम्ही अणुचाचणी कधीही करू शकतो, असेही निक्षून सांगितले.

फेब्रुवारी १९९६पासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली. नव्या आर्थिक धोरणाची चांगली फळे तोपर्यंत दिसू लागली असल्याने काँग्रेसला बहुमत मिळेल, अशी राव यांना खात्री होती. आता नवीन सरकार आल्यावरच अणुस्फोट केला जाईल असे अब्दुल कलाम यांना वाटत होते; पण अचानक एप्रिलमध्ये राव यांनी कलाम यांना कळविले की, माझा आदेश कधीही येईल. अणुस्फोट करायची पूर्ण तयारी करा. मेच्या सुरुवातीला अणुचाचणीची तयारी अब्दुल कलाम यांनी केली; पण रावांकडून आदेश आला नाही. निवडणुकीत रावांचा पराभव झाला व अणुचाचणी बारगळली. ही माहिती स्वत: डॉ. अब्दुल कलाम यांनी सातव्या पी. एन. काव स्मृती व्याख्यानात २४ जानेवारी २०१३ मध्ये दिली.अणुचाचणीचा आदेश का दिला नाही? राव यांच्या निर्णयाचे गूढ कायमप्रचाराच्या काळात अणुचाचणीच्या त्वरित तयारीचा आदेश राव यांनी का दिला व नंतर तो तडीस का नेला नाही, हे कोडे आहे. प्रचाराच्या काळात असा मोठा निर्णय घेणे लोकशाहीतील संकेतानुसार चुकीचे ठरेल या भावनेतून राव यांनी आदेश दिला नाही की आपण सत्तेत नक्की येऊ, या विश्वासापायी त्यांनी निर्णय पुढे ढकलला हे अद्याप चरित्रकारांना कळलेले नाही. निवडणुकीतील विजयाची रावांना खात्री होती. पराभव झाल्यावर ते व्यथित झाले होते. निवडणूक प्रचार ऐन भरात असताना नरसिंह राव यांनी अणुचाचणी केली असती, तर या धाडसावर खूश होऊन जनतेने कदाचित काँग्रेसला बहुमत दिले असते. काँग्रेसला बहुमत मिळाले असते, तर राव-मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सुधारणांचा पाया भक्कम झाला असता व पुढील सुधारणा अधिक वेगाने झाल्या असत्या. भाजपाला सत्ता स्थापण्याची संधीही कदाचित मिळाली नसती. भारताचा राजकीय इतिहासही बदलला असता; पण तसे होणे नव्हते.पुढे दोन वर्षांनी मे १९९८ मध्ये त्या वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुस्फोट केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणेisroइस्रो