शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवरून नाना पटोलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 15:10 IST

केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र, त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही.

पुणे : केंद्रातील मोदी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार सोहळा नुकताच झाला आहे. त्यामध्ये ४३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने नवीन सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोलेपुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले यांनी यावेळी विविध चालू घडामोडींवर भाष्य केले. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवर भाष्य करताना पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही. कदाचित सहकार क्षेत्राची व्यवस्था उध्वस्त करायची म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आधीपासूनच ते देशातील अनेक व्यवस्था ते उध्वस्त करत आहेतच. आणि मोदी सरकारने जर देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? असेही ते म्हणाले. 

तसेच मुख्यमंत्री उद्गाराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेना बळकट करत स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा या सूचनेवर पटोले यांनी प्रतिकिया देताना म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी तयारी कराअसे जर सांगितले असेल तर त्यात वाईट काय? मात्र, याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होतील असा नाही. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.

काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद  मिळाले नाही यावर बोलताना पटोले यांनी राज्य सरकारने आयोजित करण्यात आलेले हे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे होते असे सांगितले. पण आमच्या महाविकास आघाडी सरकारचे इंजिन पण आणि ड्रायव्हरपण चांगले आहे असेही पटोले यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस