शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला 'स्वबळा'वर लढूनच जर सत्ता आणायची असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा! शिवसेना नेते संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 19:40 IST

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल अशी घोषणा काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.....

पुणे : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल अशी घोषणा काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच राज्यात काँग्रेस सध्या जरी चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. परंतु,२०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखविला होता. आता त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील राजगुरूनगर खेड येथे संजय राऊत हे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. राऊत म्हणाले, काँग्रेसने जर स्वबळावर लढून त्यांना हिंदुस्थानमध्ये स्वतःची सत्ता आणायची असेल तर त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. जर नाना पटोले किंवा अन्य कुणी जर काँग्रेस स्वबळावर लढून लोकसभेत २८५ चे बहुमत आणून सत्ता आणणार असतील तर नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून खेड राजगुरूनगर पंचायत समितीतील राजकारण चांगलेच तापले आहे. खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव अकरा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला .२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली. त्या सदस्यांच्या बंडखोरीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची फूस असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी खेडमध्ये मोहिते पाटलांवर टीकास्त्र सोडले आहे.

तर राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना पाडून शिवसेनेचा आमदार आणणार...  खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी ते लायकीचे नाही. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला असं म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या अमिषाने पळवून नेले. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.तसेच आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. खेडच्या आमदाराची वागण्याची पद्धत हीच राहिली तर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल अशा शब्दात गर्भित इशारा दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणcongressकाँग्रेस