शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती करत चतु: श्रृंगी पोलीस ठाण्याचे एक आदर्श पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 15:14 IST

ऊर्जा प्रकल्पातून दहा किलो वॅट सौरऊर्जा निर्माण होणार असून चतु:श्रुंगी पोलिस स्टेशनमधील सर्व विद्युत व्यवस्था या अंतर्गत कार्यान्वित होईल .

ठळक मुद्देसौरऊर्जा विद्युत प्रकल्पामुळे पोलीस स्टेशनला चोवीस तास विद्युत पुरवठाआधुनिक यंत्रणा सक्षमपणे  विद्युत व्यवस्थेमुळे वापरता येणे शक्य होणार

पाषाण:  चतु:श्रुंगी पोलीस स्टेशन येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे विद्युत निर्मिती करत व स्वत:च्या विजेवर चालणारे पोलीस स्टेशन झाले आहे. चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्यातील पहिल्यांदाच चतुश्रृंगी पोलिस स्टेशनच्या इमारतीवर अकरा लाख रुपये किंमतीचा ऊर्जा प्रकल्प साकारण्यात आला आहे .या ऊर्जा प्रकल्पातून दहा किलो वॅट सौरऊर्जा निर्माण होणार असून चतु:श्रुंगी पोलिस स्टेशनमधील सर्व विद्युत व्यवस्था या अंतर्गत कार्यान्वित होईल .

सदर प्रकल्पाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश व डायरेक्टर जनरल महाऊर्जा व यशदाचे महासंचालक आनंद लिमये यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त परिमंडळ ४ प्रसाद अक्कानवरू, पोलीस उपायुक्त गायकवाड खडकी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे , पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली गलांडे, महाऊर्जा व्यवस्थापक रोडे, रोहनकर तसेच चतु:श्रुंगी पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .विद्युत निर्मितीसाठी पोलिस स्टेशनच्या छताचा वापर करण्यात आला असून या प्रकल्पामुळे पोलिस स्टेशनमधील कामाला गती मिळणार आहे .तसेच आधुनिक यंत्रणा सक्षमपणे  विद्युत व्यवस्थेमुळे वापरता येणे शक्य होणार आहे .पोलीस उपायुक्त के. व्यंकटेश म्हणाले, चतुश्रृंगी पोलिस स्टेशन प्रमाणे जर राज्यातील अन्य पोलीस स्टेशनवर देखील असे प्रकल्प उभारल्यास पोलीस स्टेशन सातत्यपूर्ण ऑनलाइन राहू शकते व विजेची अडचण येणार नाही.पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे म्हणाले,  सौरऊर्जा विद्युत प्रकल्पामुळे पोलीस स्टेशनला चोवीस तास विद्युत पुरवठा होईल तसेच पोलिस स्टेशनला वीज गेल्यानंतर येणाऱ्या अडचणींचा सामना देखील करावा लागणार नाही .यामुळे ऑनलाइन तक्रारी सीसीटीव्ही वरील वॉच यासाठी आणखी मदत होणार आहे .

टॅग्स :Puneपुणेchatushrungi policeचतु:श्रृंगी पोलीस