भाजप - मनसे युतीला माझ्या शुभेच्छा असतील; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 04:10 PM2021-08-22T16:10:21+5:302021-08-22T16:10:31+5:30

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर मनसे आणि भाजप युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली

I wish the BJP-MNS alliance all the best; Reaction of Supriya Sule | भाजप - मनसे युतीला माझ्या शुभेच्छा असतील; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

भाजप - मनसे युतीला माझ्या शुभेच्छा असतील; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देकोणी युती करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न

पुणे : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा सातत्याने होत आहे. तसेच त्यांच्या चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर मनसे आणि भाजप युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. 

सुळे म्हणाल्या “कोणी युती करावी किंवा आघाडी करावी, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर त्यांनी केलीच तर माझ्या त्यांना शुभेच्छा असतील.” पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. 

तसेच गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जातीपातीच्या राजकारणावरून खडाजंगी चालू आहे. राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर तोफ डागल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अजित पवारांबरोबरच राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यावर उत्तरे देत आहेत. अजित पवारांनी अशा लोकांच्या बोलण्याला महत्व नसल्याचे सांगितले होते. त्यापाठोपाठ आज सुप्रिया सुळेंनीही राज ठाकरेंच्या विधानावर आपले मत व्यक्त केले आहे.  

“आमचं दडपशाहीचं सरकार नाही. त्यामुळे कोणीही काही बोलावं त्याबद्दल काही हरकत नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत तसेच ते बोलले म्हणजे काही सत्य होत नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद वाढल्याच्या राज ठाकरेंच्या आरोपावर पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याच्या आरोपावर उत्तर देताना शरद पवारांनी जोरदार टोला लगावला होता. राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असं खरमरीत उत्तर पवारांनी दिलं होतं. त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं.

जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करतात - नवाब मलिक 

“राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. “या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे”, असेही नवाब मलिक म्हणाले होते.

Web Title: I wish the BJP-MNS alliance all the best; Reaction of Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.