शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

"हवामान वाईट असल्याने मी..." भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 16:47 IST

पाषाण सुस खिंड पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडला

पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पाषाण-सुस खिंड भागातील उड्डाणपुलाचे लोकार्पण आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. चंद्रकांत पाटील यांना कार्यक्रम सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. हवामान वाईट असल्यामुळे आपल्याला मुंबईहून पुण्याला येता येणार नाही, असा निरोप शिंदेंनी दिल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. त्यामुळे पाषाण सुस खिंड पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडला.  पाटील म्हणाले, नॅशनल हायवे क्रमांक ४ जोडणारा हा उड्डाणपूल तयार झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. त्यांनी मला फोनवरून सुचवलं की तूच हा कार्यक्रम सोहळ्याचे उदघाटन कर. उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार भिमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेशजी बीडकर, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

''पुणे महापालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर त्रिमूर्तीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली. हिंजवडी या भागात आयटी कंपनी आहेत. दिवसभरात हजारो लोकांना प्रवास करावा लागतो. चांदणी चौकातील ६ पदरी उड्डाणपूल झाल्यावर वाहतुकीचे सर्व प्रश्न सुटतील. पुणे शहर वाढत चालले आहे. पुण्यात पायाभूत सुविधांमध्ये येणारे पूल, उड्डाणपूल, कचरा समस्या सोडवता येतील. पुणे हे शांत शहर आहे, त्याचा विकास मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून सांडपाणी, कचरा, पाणी समस्या लवकरच सुटणार आहेत. तर मेट्रो आणि उड्डाणपुलाची कामे लवकरच पार पडतील. जगभरातून पुणे शहरात लोक येतील असं शहर आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन विकाससाठी प्रयत्न करायला हवेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.''   

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा