शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Deenanath Mangeshkar Hospital: रुग्णालयाला मी कडक शब्दात समज देणार; रुपाली चाकणकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:12 IST

नागरिकांना धर्मदायी संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देणं हे अपेक्षित असताना रुग्णाला हे उपचार देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७)  या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती. आज प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर भिसे कुटुंबियांच्या भेट घेतली आहे. आज याच प्रकरणातील अहवाल समिती राज्य महिला आयोगासमोर सादर करणार आहेत. हा अहवाल सादर होण्यापूर्वी चाकणकर भिसे परिवाराशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे. भेटीनंतर चाकणकर  यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

चाकणकर म्हणाल्या, आपण पाहतोय गेले काही दिवसापूर्वी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहेत.  खरंतर आरोग्य सुविधा हे अतिशय मूलभूत अशी गरज आहे. आणि नागरिकांना धर्मदायी संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देणं हे अपेक्षित आहे. आणि तशी नियमावली असताना रुग्णाला हे उपचार देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली. त्याच्यासाठी मागितलेली डिपॉझिटची रक्कम आणि एकंदरीत या सगळ्या घटनेमुळे यामध्ये रुग्णाचा मृत्यू झालाय. खरंतर प्रत्येक एक स्वप्न असतं आणि एक मातृत्व मिळत असताना आपल्या मुलांसोबत आपलं आयुष्य असावं. यामुळे आईचंच नाहीतर कुटुंबाचं स्वप्न भंग पावले.

कडक शब्दात समज देणार 

आज मी या कुटुंबीयांची भेट घेतली त्यांच्याकडून सविस्तर झालेला अनुभव हा खरंतर त्यांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे. याच्यामध्ये  बऱ्याच वेळा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या चर्चा, झालेले उपचार आणि जे काही रिपोर्ट हे गोपनीय असतात. पण यामध्ये हॉस्पिटलने स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला आहे. आज रुग्णाच्या गोपनीय गोष्टी जाहीर केलेल्या आहेत ते अत्यंत चुकीचं आहे. आणि या घटना या गोष्टी हॉस्पिटलने खरंतर समितीसमोर मांडायला पाहिजे होतं. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले. रुग्णालयाला मी कडक शब्दात समज देणार आहे.

टॅग्स :PuneपुणेRupali Chakankarरुपाली चाकणकरhospitalहॉस्पिटलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिसWomenमहिला