शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 08:32 IST

Ajit Pawar On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

Ajit Pawar On Sharad Pawar ( Marathi News  ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार आहे, याआधी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची राज्यात 'जन सन्मान' यात्रा सुरू आहे. दरम्यान, काल बारामती येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्ष खासदार शरद पवार यांना टोला लगावला आहे.

अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी

"मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, ती भूमिका मी साहेबांना सांगूनच घेतली. साहेब पहिल्यांदा हो बोलले नंतर पुन्हा साहेब म्हणाले मला ते योग्य वाटत नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सगळी पुढं गेलो, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्याबाबत केला.

काल उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथे डॉक्टरांच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले,  पण राजकारणात हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण आम्ही परिवार एक होतो.त्यामुळे काही अडचण नव्हती. नंतर मी काही ठिकाणी सुतोवाच केलं होत, ते तुम्ही बघितलं होत. काही डॉक्टरांनी पण मला फोन करून सांगितलं काय तुमच्या मनामध्ये म्हणालो काही नाही बाबा, शेवटी कुठं ना कुठं थांबाव लागतं.जसं आता डॉक्टर राजे थांबलेच आहेत. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या पेशंटला सांगा काही काळजी करू नका. 1967 पासून काही मिळालं नाही, आता देत आहेत तर आता घ्या मिळालं तेवढं. काहीच सोडू नका. यांना पण इतकी वर्ष मत देत आलोय, आता काय होतय दिलं म्हणून असं तुम्ही तुमच्या पेशंटला सांगा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. ( Maharashtra Politics )

अजित पवार बारामतीतूनच लढणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? कुठून लढवणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला. मी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृत सांगतो, की अजित पवार हे बारामती मतदारसंघातूनच उमेदवार असतील. मी पक्षाची पहिली जागा जाहीर करतो, असे पटेल यांनी सांगितले.

बारामतीला नवा आमदार मिळेल, असे विधान अजित पवार यांनी बारामतीतच जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. सध्या अजित पवार विविध मतदारसंघांतून लढण्यासंदर्भात आढावा घेत असून शिरूर मतदारसंघातून लढण्याबाबत ते चाचपणी करत असल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पटेल यांनी उमेदवारी जाहीर केल्याने पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण