शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 20:11 IST

संकल्प गोळे व कुटुंबियांविरोधात बारामतीत कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल

बारामती -  मला आमदार झाल्यासारखं वाटतय या गाण्याचे गायक संकल्प अजाबराव गोळे (रा. अद्विका रेसिडेन्सी, पुणावळे, पिंपरी-चिंचवड, पुणे ) यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार त्यांच्या आणि त्यांच्या  कुटुंबियांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी त्यांची पत्नी मिनल संकल्प गोळे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.या फिर्यादीनुसार त्यांचे पती संकल्प गोळे, सासू शोभा अजाबराव गोळे, सासरे अजाबराव मारुती गोळे, नणंद समिक्षा अजाबराव गोळे, दिक्षिता स्वप्निल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार ५ फेब्रुवारी २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली.मिनल व संकल्प यांचा विवाह काळज (ता. फलटण, जि. सातारा) येथे ५ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. लग्नानंतर एक महिना संसार व्यवस्थित सुरु होता. परंतु त्यानंतर पती संकल्प हे दारु पिवून येत तिच्यावर संशय घेवू लागले. तु काम व्यवस्थित करत नाही, तु कोणाबरोबरही चॅटींग करते, बोलते. तुला घरकाम येत नाही. तु तुझे बारामतीतील मेडिकल शाॅप बंद करून पुणे येथे सुरु कर अन्यथा तुला नांदवणार नाही, असे ते म्हणत. शिवाय तुला नांदवायचे नाही, तु मला घटस्फोट दे असे म्हणत तिला हाताने मारहाण, शिविगाळ, दमदाटी केली जात होती. सासू शोभा यांनी तु मला उलट बोलतेत, तुला नांदवायचे नाही असे म्हटले. तर समिक्षाच्या लग्नासाठी दहा तोळे दागिने माहेरहून आण अशी मागणी सासूने केली. सासरे यांनीही मेडिकल शाॅप पुण्यात सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आण असे म्हणत उपाशीपोटी ठेवून शारिरिक व मानसिक छळ केला.नणंद समिक्षा व दिक्षिता यांनीही सतत शिविगाळ, दमदाटी केली. लग्नावेळी घातलेले दागिने सासरच्या मंडळींनी काढून घेत तिला फेब्रुवारी २०२४ मध्ये राहत्या घरातून हाकलून दिले. त्यामुळे फिर्य़ादी या  बारामतीत बहिणीच्या घरी राहत असल्याचे फिर्य़ादीत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसCourtन्यायालयBaramatiबारामती