शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

काहींना मी पक्षात नकोय, महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांना उत्तर देणार; वसंत मोरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 6:04 PM

वसंत मोरे आणि इतर मनसेचे पदाधिकारी यांच्या अंतर्गत वादाची चर्चा सुरु

पुणे : राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेवर माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. व त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे हे मनसे सोडणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. पण त्यांनी मी पक्षातच राहणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट केले. परंतु शहर कार्यालयात पाऊल ठेवणार नाही असंही ते म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे आणि इतर मनसेचे पदाधिकारी यांच्या अंतर्गत वादाची चर्चा सुरु झाली होती. आज तोच वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.    

साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा मेळावा आयोजिय करण्यात आला होता. मात्र हा मेळावा सुरू झाल्यानंतर वसंत मोरे अनुपस्थित असल्याने विविध चर्चां रंगू लागल्या होत्या. मेळावा सुरू झाल्याच्या जवळपास अर्धा तासानंतर वसंत मोरे त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांबद्दल मोरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मला पक्षातून डावलण्याचा प्रयत्न होतोय. काही जणांना मी पक्षात नकोय. असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. बैठकीनंतर मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मोरे म्हणाले, मला काल रात्री उशिरा मेळाव्याच्या नियंत्रणाची पत्रिका आली होती. त्या पत्रिकेत कोअर कमिटीतील दहा जणांची नावे होती. पण माझे नाव वगळण्यात आले होते. मला वारंवार असं जाणवायला लागलाय कि, मला पक्षातून डावललं जात आहे. याबद्दल मी अनिल शिदोरे यांना कळवलं आहे.  

वसंत मोरे याना कोणीही टार्गेट करू शकत नाही तुम्हाला टार्गेट केलं जातंय का? असं वसंत मोर यांना विचारलं असता ते म्हणाले, मी आधीही पक्षातच होतो. आणि शेवटपर्यंत पक्षातच राहणार आहे. काहींना मी पक्षात नकोय. म्हणून ते अशा मेळाव्यांना मला बोलवत नाहीत. पण मी आता काही जास्त बोलणार नाही. येत्या महापालिका निवडणुकीत माझ्या भागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार आहे. मला कितीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तरी ते करून शकत नाहीत असंही मोरे यांनी यावेळी सांगितलं आहे . 

टॅग्स :MNSमनसेMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकPoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरे