शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 08:46 IST

Ajit pawar talk on Parth Pawar's Tweet: अजित पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले.

पुणे : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीबाबत जे घडले ते वाईट होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही अशा घटना घडता नयेत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरुन असा प्रकार करणारी विकृती दहा वेळा विचार करेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. याचबरोबर पार्थ पवार यांच्या ट्विटवरूनही अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. 

अजित पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या शतकातही प्रगतीचा मार्ग दाखविणारे आहेत, असे पवार म्हणाले. हाथरसमध्ये माणुसकीला काळीमा फासण्य़ात आला. जो प्रकार घडला त्याला शब्द नाहीत. अशा घटना महिलांच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत आहेत. काही काळ चर्चा होते आणि जो तो आपापल्या कामाला लागतो. निर्भया घडले, त्यानंतरही अनेक घटना घडल्या. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे, असे मत अजित पवार यांनी मांडले. 

राहुल गांधी यांच्या तिथे जाण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असे नाही.  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना पीडीतेच्या कुटुंबाला भेटू दिलं पाहिजे. कारण संसद असेल किंवा विधानसभा, तो विषय मांडण्यासाठी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असते, असेही अजित पवारांनी सांगितले. 

पार्थ पवार बाबत काय बोलले?पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणावरील ट्विटबद्दल छेडले असता अजित पवार यांनी मला तेवढाच उद्योग नाहीय, असा संताप व्यक्त केला. सुप्रीया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची ती भुमिका नाही.  आता अलिकडची मुलं काय काय ट्वीट करतात. प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केले, तुमच्या मुलानं ते ट्वीट केले, तेवढाच मला उद्योग नाहीय. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला त्याला अधिकार असतो. पण मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल, ज्याला त्याला आपला न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारMaratha Reservationमराठा आरक्षणMahatma Gandhiमहात्मा गांधी