शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'मी दिलगिरी व्यक्त करतो', चंद्रकांत पाटलांचा माफीनामा; 'त्या' वक्तव्याबाबत महिला आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 15:59 IST

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना केलेले तुम्ही घरी जा स्वयंपाक करा हे वक्तव्य केले होते

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना 'तुम्ही घरी जा स्वयंपाक करा' हे वक्तव्य केले होते. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात थेट पाटील यांनाच या वक्तव्याचा खुलासा करा असे पत्र पाठवले होते. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी खुलासा करत रुपाली चाकणकर यांना पत्र पाठवले आहे. सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे ते पत्रात म्हणाले आहेत. 

राज्य महिला आयोगाकडे पाटील यांच्या वक्तव्याबाबत अनेकांनी तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यात हा महिलांचा अवमान आहे इथपासून ते महिलांच्या बाबतीत असा विचार केला जात असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करणारी पत्रेही होती. पुणे शहर लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. असीम सरोदे यांच्या याच आशच्याच्या पत्राचाही त्यात समावेश होता. त्यामुळेच आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी थेट पाटील यांनाच एक पत्र पाठवले. त्यात त्यांनी तुमचे हे वक्तव्य समस्त महिला वर्गाच्या आत्मसन्माला ठेच पोहचवणारे आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३, कलम१२ (२), व १२ (३) नुसार या वक्तव्याचा येत्या दोन दिवसात आयोगाकडे लेखी खुलासा सादर करावा असे आयोगाच्या पत्रात चाकणकर यांनी नमुद केले होते. त्यानुसार पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

मी दिलगिरी व्यक्त करतो

आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा . प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते. यासारखे आयुष्यात दु:ख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. असे चंद्रकांत पाटलांनी महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSocialसामाजिक