शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'मला सगळ्याचा मनःस्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते', तुकाराम सुपेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 19:57 IST

टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाल्यापासून सुपे तणावात असल्याची माहिती त्याचे वकील मिलिंद पवार यांनी दिली

पुणे : टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपेला अटक करून निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या घर आणि कार्यालयातील छापेमारीत कोट्यावधींचे घबाडही सापडले. हा घोटाळा उघड झाल्यापासून सुपे तणावात असल्याची माहिती त्याचे वकील मिलिंद पवार यांनी दिली आहे. तर सुपे याने मला आत्महत्या करावीशी वाटते, असा इशाराही दिला आहे. ''तर टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी मला बळीचा बकरा बनवलं जातंय. मला जाणूनबुजून टार्गेट केलं जात असून या सगळ्याचा मनःस्ताप होत असल्याचे सुपे यावेळी म्हणाला असल्याचे पवार यांनी सांगितले. सुपेच्या कुटुंबातील लोकांनाही आरोपी करणार असल्याची पुणेपोलिसांची तयारी आहे. 2017 मध्ये ज्या कंपन्या होत्या, त्यांनाच कामे दिली होती. मात्र या सगळ्यात मला बळीचा बकरा बनवलं जात आहे, अशी प्रतिक्रिया सुपेने दिल्याचे मिलिंट पवार म्हणाले सांगितले आहेत.''  

मुलगी आणि जावयाकडे दिलेल्या बॅगेत आढळले होते १ कोटी 

राज्य परीक्षेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा जप्त केल्या असून त्यात तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांची रोकड तसेच एकूण ४४ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा जवळपास २ कोटी रुपयांहून अधिकचा ऐवज जप्त केला होता. तपासात सापडलेल्या दागिन्यांचे मुल्यांकन सोनारांमार्फत करण्यात आले होते.

तुकाराम सुपे याच्या घरी ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने असा ९६ लाख

घरी दुसऱ्यांदा टाकलेल्या धाडीमध्ये २ कोटी रुपयांची रोकड, दागिने सापडले असून पोलिसांनी जप्त केले होते. तुकाराम सुपे याला पोलिसांनी पकडल्याचे समजल्यानंतर त्याच्या पत्नीने हा ऐवज मेव्हणाकडे दिला होता. पोलीस चौकशीत ही माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी १ कोटी ९८ लाख रुपयांची रोकड व दागिने जप्त केले आहेत. याअगोदर तुकाराम सुपे याच्या घरातून ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

सुपे आणि सावरीकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये ३० डिसेंबरपर्यंत वाढ 

न्यायालयाने सुपे आणि सावरीकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये ३० डिसेंबरपर्यंत वाढ केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी हा आदेश दिला. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुपे व सावरीकर यांच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत 3 कोटी 90 लाख जप्त केले 

तुकाराम सुपे यांच्या घरी, कार्यालयांमध्ये पुणे पोलिसांनी केलेल्या छापेमारी मध्ये आत्तापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर दीड किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमexamपरीक्षाEducationशिक्षण