शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मी राज्याचा अर्थमंत्री; निधीच दिला नाही तर..., अजित पवारांचा दत्तात्रय भरणेंना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 13:42 IST

अजित पवार यांच्या या अनपेक्षित वक्तव्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चांगलेच गोंधळले

बारामती : दत्तामामा बांधकाम खात्याचा राज्यमंत्री आहे. बांधकाम खात्याच्या चाव्या त्याच्या हातात आहेत. मात्र या राज्याचा वित्तमंत्री मी आहे. त्यामुळे तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चिमटा काढला.  निंबुत (ता. बारामती) येथे रविवारी  (दि. 27) एका  उद्घाटन कार्यक्रमांमध्ये  उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. 

पवार म्हणाले, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा निरा-बारामती रस्ता महत्त्वाचा आहे. बांधकाम खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे येथे उपस्थित आहेत. दत्तामामा तुम्ही नुसता इंदापूर तालुक्याकडे लक्ष देऊ नका. मला देखील या बाबाला विनंती करावी लागते आमच्या तालुक्यातील रस्त्यांना देखील निधी द्या. अशी मिश्किल टिप्पणी करत अजित पवार पुढे म्हणाले, बांधकाम खात्याच्या चाव्या जरी दत्तामामा च्या हातात असल्या तरी वित्तमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मीच निधी दिला नाही तर घंटा मिळणार, अजित पवार यांच्या या अनपेक्षीत वारामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चांगलेच गोंधळले. तर सभागृहात देखील हास्यकल्लोळ उडाला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीMaharashtraमहाराष्ट्र