पुणे : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
चाकणकर यांनी योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील असे समाजमाध्यमांवर पोस्ट करून सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील! या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल असे त्यांनी सांगितले.
चाकणकर यांचा राजीनामा घेतल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
दरम्यान भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. अटकेनंतर खरातचे अनेक बड्या नेत्यांसोबतचे संबंध उघड झाले आहेत. मात्र, महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या चरणी लीन झाल्याचे फोटो समोर आल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. खरातची पाद्यपूजा करतानाचे फोटो व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली होती. या सर्व घडामोडीनंतर मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर याना तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
Web Summary : Rupali Chakankar resigned as State Women's Commission head after allegations linked her to Ashok Kharat, accused of exploiting women. Sunetra Pawar will forward it to the CM for a transparent inquiry following the controversy and pressure.
Web Summary : अशोक खरात से जुड़े आरोपों के बाद रूपाली चाकणकर ने राज्य महिला आयोग के अध्यक्ष पद से इस्तीफा दिया। सुनीता पवार ने पारदर्शिता सुनिश्चित करने के लिए मुख्यमंत्री को आगे की जांच के लिए इस्तीफा भेजा।