शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण

By राजू हिंगे | Updated: November 15, 2024 19:13 IST

महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी  एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस अशी नावे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारसभा आणि बैठका यांना वेग आला आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागणार आहे. महायुती असो की महाविकास आघाडी, मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, महायुतीतील मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस अशी नावे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत, तर आघाडीतील उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील या नावांचीही चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर विनोद तावडेंचे नाव अचानक चर्चेत आले. मुख्यमंत्रीपदासाठी सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम देत तावडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

विनोद तावडे म्हणाले, "मी राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असून आता मी केंद्रीय स्तरावर काम करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती सरकार सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दिल्ली येथे चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल," असे तावडे म्हणाले.

"बटेगे तो कटेंगे"ला माझा पाठिंबा""बटेगे तो कटेंगे"" हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती-जातींमध्ये लोक विभागले गेले की त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने घेतात, त्यामुळे काही जण विरोध दर्शवतात," असे भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. "लोकसभेला महायुतीच्या जागा कमी आल्या, पण आता अनेक पक्ष निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतविभाजन होऊन युतीला चांगल्या जागा मिळतील," असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यातदरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. राज्यभर प्रचार दौरे करताना सामान्य मतदारांची भावना समजून घेतल्यास महायुती स्पष्ट बहुमताच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शरद पवारांची दुटप्पी भूमिका"लोकसभा निवडणुकीत '४०० पार' नारा दिल्यानंतर मोदी पुन्हा निवडून येतील, हे लक्षात घेऊन काही लोक मतदानाला आले नव्हते. मात्र यंदा ते नक्की येतील. राज्यात स्पष्ट बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेवर येईल. महायुतीने प्रत्यक्ष लाभार्थी आणि अप्रत्यक्ष माध्यमातून विकास साधला आहे. विविध सरकारी योजनांद्वारे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे. 'लाडकी बहिण' योजना राज्यात खूप लोकप्रिय ठरली आहे," असे तावडे म्हणाले.

"ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'लाडकी बहिण' योजना राबवताना इतर खात्यांचे पैसे वळवल्याचा आरोप केला, मात्र स्वतःच्या जाहीरनाम्यात तीच योजना राबवण्याचे वचन दिले आहे. ही दुटप्पी भूमिका आहे. शरद पवार यांच्या सभांचे नियोजन करणारी व्यक्ती पाऊस कुठे आहे हे पाहून त्यांचे सभांचे आयोजन करत असल्याचे दिसते. मात्र, पाऊस पडल्याने जागा जिंकता येते, हा भ्रम आहे. " असेही तावडे म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinod Tawdeविनोद तावडेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस