शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"मैनेही मर्डर किया था साहब", असे म्हणत महिलेने पोलिसी खाक्या दाखवताच केला गुन्हा कबूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 11:42 IST

सुरुवातीपासून पोलिसांचा पत्नीवर संशय बळावला होता. त्यांनी अवघ्या चार दिवसात गुन्ह्याची उकल केली.

ठळक मुद्देनऱ्हे येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीत मृत अवस्थेत सापडलेल्या तरुणाचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले होते.

धायरी: मेरा पती घर से बाहर गया था... उसको किसने मारा, मुझे कूछ नही पता..असं म्हणणाऱ्या महिलेला पोलिसी खाक्या दाखवताच मैनेही मर्डर किया साहब.. असं म्हणत तिने आपल्या पतीचा खून केल्याचे कबूल केले. ग्यानदेवी प्रसाद ( मूळ राहणार: बिहार, सध्या: नऱ्हे, पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. बिहार मधील दोन अल्पवयीन मुलांचाही या हत्येत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

नऱ्हे येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीत मृत अवस्थेत सापडलेल्या तरुणाचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले होते. कृष्णकुमार प्रसाद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णकुमार गेल्या एक वर्षापासून नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरातील आपल्या पत्नीसमवेत राहत होता. तो उदरनिर्वाहासाठी सुतारकाम करीत असल्याची माहिती मिळत आहे. रविवारपासून कृष्णकुमार बेपत्ता होता.

दरम्यान २ जूनला सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह शववि्छेदनासाठी ससूनला पाठविण्यात आला. दरम्यान मंगळवारी शववि्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले. याबाबत सुरुवातीला अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तांत्रिक माध्यमातून तपास करून महिलेला ताब्यात घेतले. सुरुवातीला मेरे पतिको मैने नही मारा..असं म्हणणारी ग्यानदेवीला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच पतीचा खून केल्याचे कबूल केले.

ग्यानदेवी हिचे पाहिले एक लग्न झाले असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. मात्र कृष्णप्रसादची ओळख झाल्यानंतर तिने पहिल्या पतीला व मुलाला सोडून कृष्णप्रसाद बरोबर पुण्यात आली होती. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाबरोबर बोलू देत नव्हता. त्याचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध होते. त्याचबरोबर मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले असता १० जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

चार दिवसात केली गुन्हाची उकल

कोणताही पुरावा नसताना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याची उकल केली. सुरुवातीपासून ग्यानदेवीवर पोलिसांचा संशय बळावला होता. मात्र ती मला काही माहीत नाही, माझा पती बाहेर गेला होता, असे म्हणत असल्याने  गुन्ह्याची उकल होत नव्हती. मात्र पोलिसांनी तांत्रिक माध्यमातून तपास करून अखेर महिलेला ताब्यात घेतले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू