शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर पकडला ३४ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा; बँकॉकहून आलेला प्रवासी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 17:18 IST

जप्त केलेल्या या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे ३३.६० लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत तब्बल ९६० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) जप्त केला आहे. याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे झोनच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी संशयावरून बँकॉकहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या आयएक्स-२४१ या विमानाने आलेल्या प्रवाशाची तपासणी केली. तपासादरम्यान त्याच्या हँडबॅगमध्ये लपवून ठेवलेले हायड्रोपोनिक गांजाचे दोन पारदर्शक व्हॅक्युम सीलबंद पॅकेट्स आढळून आले. दोन्ही पॅकेट्स आतून कार्बन पेपरमध्ये गुंडाळून चतुराईने लपवण्यात आली होती. जप्त केलेल्या या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे ३३.६० लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित प्रवाशाला अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून, या मागील आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Airport: Passenger Arrested with Hydroponic Marijuana Worth ₹34 Lakhs

Web Summary : A passenger arriving from Bangkok was arrested at Pune Airport for possessing 960 grams of hydroponic marijuana worth ₹34 lakhs. The drugs were concealed in his hand baggage. Investigation is underway to uncover international racket.
टॅग्स :pune airportपुणे विमानतळpassengerप्रवासीDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा