शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

हुश्श... मतदानाच्या कालावधीत ७०० बस धावल्या पण एकाही बसचे ब्रेकडाऊन नाही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 20:12 IST

एकही बसचे ब्रेकडाऊन न झाल्याने पीएमपी प्रशासनासह निवडणुक प्रशासनानेही सुस्कारा टाकला...

ठळक मुद्देपीएमपीच्या दररोज किमान १५० बस मार्गावर बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप

पुणे : मतदानासाठीचे साहित्य व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी दोन दिवस ७०० बस धावल्या. पण त्यापैकी एकही बसचे ब्रेकडाऊन न झाल्याने पीएमपी प्रशासनासह निवडणुक प्रशासनानेही सुस्कारा टाकला. पीएमपीच्या दररोज किमान १५० बस मार्गावर बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाकडून पीएमपीच्या बस घेतल्या जातात. मतदानच्या दिवशी व आदल्यादिवशी मतदान साहित्य व कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी या बसचा वापर केला जातो. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने पीएमपीच्या ७०० बस घेतल्या होत्या. पहिल्यांदाच एकावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बस घेण्यात आल्या. पीएमपीच्या बसच्या ब्रेकडाऊनचे सध्याचे प्रमाण दररोज किमान १५० ते १६० एवढे आहे. त्यामुळे एवढ्या जास्त बस निवडणुक कामासाठी दिल्या जाणार असल्याने पीएमपी प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते. निवडणुकीचे सामान वेळेत व सुरक्षितपणे मतदान केंद्रापर्यंत पोहचविणे व परत आणण्याची महत्वाची जबाबदारी पीएमपीवर होती. एकही बस मार्गावर बंद पडू न देता मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी, यासाठी पीएमपी प्रशासनाकडूनही मागील काही दिवसांपासून प्रयत्न केले जात होते.अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, एकुण ७०० बसमध्ये सुमारे ३०० नवीन सीएनजी बस, सुमारे १०० मिडी बस आणि उर्वरीत जुन्या बस होत्या. जुन्या बस निवडताना त्यांचा फिटनेस आधी पाहण्यात आला. त्यानंतर प्रत्येक बसची काळजीपुर्वक तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार काही दुरूस्त्या करण्यात आल्या. त्यानंतरच या बस निवडणुक कामासाठी सोडण्यात आल्या. मतदानापुर्वी आठ दिवसआधीपासून हे काम सुरू होते. या बसमध्ये एकही भाडेतत्वावरील बस नव्हती. लोकसभा निवडणुकीवेळी २ बस बंद पडल्या होत्या. त्यामुळे पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांनी सर्व बसची काटेकोरपणे तपासणी करण्याची सुचना दिली होती. त्यामुळे रविवारी व सोमवारी दोन्ही दिवशी एकही बस बंद पडली नाही. तसेच बस बंद पडल्यास तातडीने दुरूस्त करण्यासाठी ठिकठिकाणी दुरूस्ती पथक तैनात करण्यात आले होते. पण त्याची गरज पडली नाही, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले.--------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019