शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरहून येऊन पहिल्या पत्नीने सवतीला शिकवला धडा; घरात शिरुन मारहाण करुन चोरला ऐवज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 17:51 IST

सोलापूरमध्ये मेडिकल दुकान असल्याने पुण्यात राहत असलेल्या सवतीला पहिल्या पत्नीला मारहाण केली. 

पुणे : सोलापूरमध्ये मेडिकल दुकान असल्याने पुण्यात दुसरा घरोबा केला. त्यावरुन गेल्या २ वर्षापासून त्यांच्यात वादावादी सुरु होती. शेवटी पहिली पत्नी व तिच्या नातेवाईकांनी पुण्यात येऊन सवतीच्या घरात शिरुन तिला मारहाण केली. घरातील वस्तूंची तोडफोड करुन दीड लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी हिंगणे येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिची सवत व तिच्या ८ नातेवाईकांविरुद्ध विनयभंग, खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गेल्या २ वर्षांपासून त्या कृष्णा सुरवसे यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या पतीचे सोलापूरमध्ये मेडिकल दुकान आहे. त्या पतीसह हिंगणे येथे राहतात. ही बाब त्यांच्या पहिल्या पत्नीला माहिती होती. त्यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. ८ जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांची पहिली पत्नी व तिचे नातेवाईक त्यांचा शोध घेत फिर्यादी यांच्या घरी आले. परंतु, त्यांचे पती त्यांना सापडले नाही. फिर्यादी यांनी दार उघडल्यावर ते सर्व जण घरात शिरले. त्यांनी फिर्यादी यांना खाली पाडून कपडे फाडले. रवी साळुंके याने त्यांचा विनयभंग केला. त्याने कोयत्याने व त्यांच्या सवतीने चाकूने त्यांच्यावर वार केले. परंतु, त्यांनी हे वार चुकविले. इतरांनी घरातील वस्तुंची तोडफोड करुन १ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक कादबाने अधिक तपास करीत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस