Pune: पतीच बनला वैरी; माहेरुन 30 लाख रुपये घेऊन येण्यासाठी पत्नीच्या डोक्यात घातला खलबत्ता
By नम्रता फडणीस | Updated: October 23, 2023 13:55 IST2023-10-23T13:55:42+5:302023-10-23T13:55:56+5:30
ही घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते २२ ऑक्टोबर पहाटे 3.30 दरम्यान वडगाव शेरी येथील राहत्या घरी घडली...

Pune: पतीच बनला वैरी; माहेरुन 30 लाख रुपये घेऊन येण्यासाठी पत्नीच्या डोक्यात घातला खलबत्ता
पुणे : नणंदेच्या मुलाच्या वाढदिवसावरुन परतत असताना पत्नीवर लोखंडी कोयत्यासह खलबत्ता डोक्यावर मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते २२ ऑक्टोबर पहाटे 3.30 दरम्यान वडगाव शेरी येथील राहत्या घरी घडली.
याप्रकरणी पत्नीने पतीवर फिर्याद दिली आहे. तुझ्या आई-वडिलांनी लग्नात खर्च केला नाही, तू तुझ्या माहेरकडून 30 लाख रुपये घेऊन ये अन्यथा शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल् करण्याची धमकी देत सातत्याने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करायचा. दि. २१ ऑक्टोबर रोजी नणंदेच्या मुलाच्या वाढदिवसावरुन परतत असताना आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर लोखंडी कोयत्यासह खलबत्ता डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्यांच्या वडिलांना बोलावून घेतले असता पतीने त्यांच्यावरही धारदार हत्याराने मारुन त्यांना जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक घोरपडे पुढील तपास करीत आहेत.