पत्नीसोबतच्या किरकोळ वादातून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 13:23 IST2018-04-21T13:23:10+5:302018-04-21T13:23:10+5:30
पती-पत्नीत झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नीसोबतच्या किरकोळ वादातून पतीची आत्महत्या
वाकड : पती-पत्नीत झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काळेवाडी येथे गुरुवारी ( दि. १९ एप्रिल ) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. राहुल विश्वनाथ रिकीबे (वय ३२, रा. श्रीकृष्ण कॉलनी नढेनगर, काळेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री रिकीबे व त्यांची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. यानंतर सकाळी त्यांच्या पत्नी मुलाला पोलिओ डोस देण्यासाठी हडपसरला आपल्या आईकडे गेल्या. दरम्यान, राहुल यांनी छताच्या लोखंडी हुकला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही राहुल जेवायला न आल्याने शेजारच्या गल्लीत राहत असलेल्या राहुल यांच्या आई घरी पाहायला आल्या असता दरवाजा उघडा ठेवून राहुलने आत्महत्या केल्याचे उघड झाले.