पत्नी माहेरी गेल्याने पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 23:47 IST2018-11-10T23:47:06+5:302018-11-10T23:47:31+5:30

दीपावलीच्या काही दिवस अगोदर त्यांचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला. या कारणातून पत्नी माहेरी निघून गेली होती.

Husband sues suicide after wife goes to Maheri | पत्नी माहेरी गेल्याने पतीची आत्महत्या

पत्नी माहेरी गेल्याने पतीची आत्महत्या

नवी मुंबई : पत्नी माहेरी निघून गेल्याच्या कारणावरून पतीने आत्महत्या केल्याची घटना घणसोलीत घडली आहे. बंद घरातून दुर्गंधी येवू लागल्याच्या शेजाऱ्यांच्या तक्रारीमुळे तीन दिवसांनी हा प्रकार उघड झाला. परंतु पती-पत्नीमधील वादाचे नेमके कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही.

शंकर कोळेकर (४०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घणसोली येथील शंकरबुवा वाडी परिसरात ते सहकुटुंब राहायला होते. दीपावलीच्या काही दिवस अगोदर त्यांचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला. या कारणातून पत्नी माहेरी निघून गेली होती. त्याचा मनस्ताप झाल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यानच्या काळात त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाºयांनी पोलिसांकडे केली. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडला. यावेळी आतमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याचे उपनिरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले. त्यानुसार पत्नी माहेरी निघून गेल्याच्या कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र पती-पत्नीमधील भांडणाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
 

Web Title: Husband sues suicide after wife goes to Maheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.