शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

थकीत पोटगी न भरल्याने पतीची महिन्याभरासाठी कारागृहात रवानगी

By नम्रता फडणीस | Updated: February 7, 2025 12:43 IST

ही पोटगीची रक्कम ७ लाख ९५ हजार रुपये इतकी थकीत रक्कम होती

पुणे :न्यायालयाने पत्नीला पोटगी देण्याचा आदेश दिला होता. मात्र, पतीने पोटगीची रक्कम न भरता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. बडवे यांनी पतीची महिन्याभरासाठी कारागृहात रवानगी केली आहे.

पत्नीच्या वतीने ॲड. ऋतुराज पासलकर, ॲड. पुष्कर पाटील, ॲड. प्रतीक पाटील आणि ॲड. समर्थ हुंडेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. पत्नीने दि. ९ मार्च २०२१ रोजी कौटुंबिक हिंसाचाराबाबत न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयीन खटल्यामध्ये हजर न झाल्यामुळे पतीच्या विरोधात न्यायालयाने दि. २३ जुलै २०२३ रोजी एकतर्फी आदेश दिला होता. त्यानुसार न्यायालयाने पत्नीला १५ रुपये, तसेच मुलाला ५ हजार रुपये उदरनिर्वाह करता, तसेच घर भाड्यापोटी ५ हजार रुपये असे एकूण दरमहा २५ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले होते. याशिवाय नुकसान भरपाई म्हणून ४० हजार, तसेच प्रस्तुत प्रकरणाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या आदेशानुसार पतीने पोटगीची रक्कम न भरली नाही.ही पोटगीची रक्कम ७ लाख ९५ हजार रुपये इतकी थकीत रक्कम होती. त्या अनुषंगाने पत्नीने वकिलांमार्फत पीडब्ल्यूडीव्हीए एक्झिक्युशन दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयात दाखल केले होते. याबाबत पत्नीच्या वकिलांनी दि. ९ जानेवारीला न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १२५ (३) प्रमाणे पतीला सिव्हिल प्रिझनमध्ये घेण्याचा अर्ज केला होता. न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करीत असल्याने पतीला न्यायालयीन कोठडीत घेण्यात यावे; तसेच पत्नी व मुलाची देखभाल करणे हे पतीचे प्रथम कर्तव्य आहे. त्यापासून पतीची सुटका होऊ शकत नाही असा युक्तिवाद पत्नीच्या वकिलांनी केला. त्यानुसार सर्व बाबी विचारात घेऊन न्यायालयाने पतीला एक महिना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने न्यायालयाने पतीला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात त्याची रवानगी केली आहे.

एखाद्या व्यक्तीला तुरुंगात पाठविणे ही समाधानाची पद्धत नसून, ही अंमलबजावणीची पद्धत आहे. तुरुंगात पाठविण्याचा संपूर्ण उद्देश म्हणजे जी व्यक्ती पुरेशा कारणाशिवाय आदेशाचे पालन करण्यास नकार देऊन, पोटगी देण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीला, आदेशाचे पालन करण्यास आणि पोटगी भरण्यास बांधील करते. - ॲड. ऋतुराज पासलकर, पत्नीचे वकील 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालयPoliceपोलिसFamilyपरिवार