शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

पतीकडून गरोदर पत्नीची हत्या; नंतर आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:59 AM

पिरंगुट येथील घटना : शस्त्राने केले वार

पौड : पिरंगुट येथे असलेल्या सुनील विलास शिंदे (वय ३३) याने घरगुती भांडणातून आपल्या गरोदर असलेल्या पत्नीवर शस्त्राने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर सुनील यानेही स्वत:लाही भोसकून घेत स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. २०) सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली. सुनील शिंदे याचे मूळ गाव मुळशी तालुक्यातील पिंपळोली असून त्याचा पिरंगुट येथे वाहनांच्या बॅटरी विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्यानिमित्ताने तो पिरंगुट येथे राहत होता. मागील एक वर्षापूर्वीच त्याचे अनिताबरोबर लग्न झाले होते. लग्नापूर्वी त्याने पिरंगुट येथे स्वत:चा फ्लॅट विकत घेतला होता. दोघे नवरा-बायको या नवीन घरात वास्तव्यास होते.

सकाळी घरात असताना नवरा-बायकोमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले. आतून दार लावून हे भांडण सुरू असताना त्यांच्या पत्नीला तो मारहाण करून तिच्यावर हल्ला केल्यानंतर ती गॅलरीत येऊन ‘मला वाचवा मला वाचवा’ अशी ओरडू लागली. त्यावेळी त्या इमारतीत राहणारे लोक शिंदे यांच्या घराच्या दिशेने पळाले; परंतु दरवाजा आतून बंद असल्याने कोणालाच काही करता येईना. शेजारील नागरिक दारात उभे राहून आवाज देत असताना आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने ती माहिती पोलिसांना कळविल्यावर घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याअगोदरच दोघांचीही प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपासणीसाठी मृतदेह ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMurderखून