पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पतीने केला खून; पतीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 23:13 IST2024-06-15T23:13:37+5:302024-06-15T23:13:45+5:30
काजल कृष्णा कदम वय २७ वर्ष असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पतीने केला खून; पतीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल
धनकवडी : घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नी च्या गळ्यावर वार करून खून केला, त्यानंतर पतीने लाॅज ला कुलूप लावून पळून गेला. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री उशिरा उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. काजल कृष्णा कदम वय २७ वर्ष असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार काजल आणि कृष्णा पती पत्नी होते, ते दोघेही मंजूरी चे काम करत होते, शनिवारी दुपारी ते भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लाॅजवर उतरले होते, दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते, मात्र दोघांनी हि पुन्हा एकत्रित येण्याचा विचार केला आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी लाॅज वर आले होते, दरम्यान दोघांनी हि मद्यपान केले, आणि त्यांच्या मध्ये वाद झाला, या नंतर पतीने चाकू साह्याने पत्नी च्या गळ्यावर वार करून खून केला आणि पळून गेला, काही वेळाने त्याने आपल्या मित्राला पत्नी चा खून केल्याची माहिती दिली, मित्राने ताबडतोब पोलिसांना कळवले.
दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, लाॅज चे कुलुप तोडून रुम उघडकी असता काजल मृत्य अवस्थेत आढळून आली.