शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमधून पत्नीच्या त्रासाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 13:40 IST

सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तपासादरम्यान महावीर याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली

पुणे : पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका 32 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. एक महिन्यापूर्वी हा प्रकार घडला. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित तरुणाच्या पत्नी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

महावीर उत्तम जगदाळे (वय ३२) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी रजनी महावीर जगदाळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाचे वडील उत्तम श्रीराम जगदाळे (वय 58) यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ८ नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर आणि रजनी या दोघांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरळीकांचन गावात हे दोघे पती-पत्नी राहत होते. पती मोलमजुरीचे काम करता होता. तर पत्नी बांधकाम साईटवर मजुरीचे काम करत होती. लॉकडाऊनमध्ये पतीने काम सोडले होते. त्यानंतर तो गावाला गेला होता. गावावरून परतल्यावरही तो घरीच बसून असल्याने पती आणि पत्नीमध्ये वाद होऊ लागले.

पती ऐकत नसल्याने पत्नीने सासऱ्यांकडे पतीची तक्रारही केली होती. सासऱ्यांनी समजून सांगूनही पतीने पुन्हा कामाला सुरुवात केली नाही. दोघांमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या कारणाच्या वादावरून महावीर जगदाळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तपासादरम्यान महावीर याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. त्यामुळे त्याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू