पत्नीचा खून करणा-या पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 12:31 IST2018-04-26T12:31:03+5:302018-04-26T12:31:03+5:30

मुलाला घरात का घेतले या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीला झा-याने मारहाण करून तिचा खून केल्याची घटना धनकवडीतील चव्हाण कॉम्प्लेक्स येथे बुधवारी रात्री घडली. सुधा रवी केसरी (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे.

Husband arrested for murdering wife | पत्नीचा खून करणा-या पतीला अटक

पत्नीचा खून करणा-या पतीला अटक

पुणे : मुलाला घरात का घेतले या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीला झा-याने मारहाण करून तिचा खून केल्याची घटना धनकवडीतील चव्हाण कॉम्प्लेक्स येथे बुधवारी रात्री घडली. सुधा रवी केसरी (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी पती रवी नंदलाल केसरी (वय ५५, रा. चव्हाणनगर कॉम्प्लेक्स, धनकवडी)याला अटक केली आहे. याप्रकरणी संदीप रवी केसरी (वय २४) या मुलाने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, धनकवडीतील चव्हाण कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वाराजवळील इमारतीत पहिल्या मजल्यावर केसरी कुटुंब राहतं. रवी केसरी हे रिक्षाचालक आहेत. त्यांना दोन मुले आहेत. संदीप याच्यावरून पती-पत्नीत वाद झाला होता. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुधा यांनी मुलगा संदीप याला घरात घेऊन दार लावले. तू त्याला घरात का घेतले असे म्हणून रवी केसरी याने आपल्या पतीला स्टीलच्या झा-याने मारहाण करण्यास सुरुवात केली. 

सुधाचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रवी याने आपली मुलगी हिचे डोके काचेवर आपटून  मारहाण केली. त्यात ती किरकोळ जखमी झाली आहे. संदीप याला केलेल्या मारहाणीत त्याच्या हाताला मार लागला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी पती रवी केसरी याला अटक केली आहे. 

Web Title: Husband arrested for murdering wife

टॅग्स :Arrestअटक