शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

विनोदाला वाचक मिळत नाहीत : श्रीनिवास भणगे; पुण्यात कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 7:13 PM

गेली अनेक वर्षे, दृश्य माध्यमं आणि विनोदी वक्ते-लेखक लोकप्रिय झाल्याने विनोदाला प्रेक्षक भेटतात,पण वाचक भेटत नाहीत' अशी खंत विख्यात लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यानी व्यक्त केली. कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते.

ठळक मुद्देमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभचिं. वि. जोशींचा विनोद हा उपहास करणारा नव्हता, परिहास साधणारा होता : मिलिंद जोशी

पुणे : गेली अनेक वर्षे, दृश्य माध्यमं आणि विनोदी वक्ते-लेखक लोकप्रिय झाल्याने विनोदाला प्रेक्षक भेटतात,पण वाचक भेटत नाहीत' अशी खंत विख्यात लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यानी व्यक्त केली.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. 'दिवस असे की'या विनोदी कथासंग्रहासाठी हा पुरस्कार लेखिका दीपा मंडलिक,मुंबई यांना श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशक सायन पब्लिकेशन,पुणे यानाही हा पुरस्कार देण्यात आला. समारभाच्या अध्यक्षस्थानी मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी हे होते. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार, लेखिका शकुंतला  फडणीस, दीपा मंडलिक उपस्थित होते.'विनोदाची मूलभूत तत्वे सांगून,बुद्धीला चालना देणारा विनोद सध्या अभावाने आढळतो याकडेही भणगे यांनी लक्ष वेधले. अध्यक्षीय भाषणात बोलताना मिलिंद जोशी म्हणाले, चिं. वि. जोशींचा विनोद हा उपहास करणारा नव्हता, परिहास साधणारा होता. स्वत: वर केलेला विनोद श्रेष्ठ ठरतो आणि हास्य लोपणं ही सांस्कृतिक अधोगती ठरते,म्हणून विनोदी साहित्य अधिक आले पाहिजे.सुवर्णा दिवेकर आणि शकुंतला फडणीस यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी ग्रंथनिवड केली. शकुंतला फडणीस यानी चिं. विं.च्या आठवणी जागवल्या आणि निवड केलेल्या पुस्तकाची समीक्षा केली. पहिल्याच पुस्तकाला, चि. विं. सारख्या दिग्गज विनोदी साहित्यिकाच्या नावाचा, म. सा. प.चा पुरस्कार मिळाल्याने हुरुप वाढला असल्याची भावना  दीपा मंडलिक यांनी व्यक्त केली. म. सा. प. चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यानी प्रास्ताविक केले तर कार्यवाह बण्डा जोशी यानी सूत्रसंचालन केले. कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदMilind Joshiमिलिंद जोशीPuneपुणे