शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

तेरा वर्षे होऊनही घर नावावर होईना़ !; मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:34 PM

शासनाची हुडकोची योजना शहरात १९८९ मध्ये आली. या योजनेअंतर्गत म्हाडाकडून ३७१ गुंठे जागा मिळाली. या जागेत ३७१ घरे उभारली गेली.

ठळक मुद्देहुडकोवासीय त्रस्त : शासन गांभीर्याने घेत नसल्याने संताप.शिरूर-हवेलीचे भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णेनीही याबाबत केला पाठपुरावा.

शिरूर : घराचे हप्ते फेडून १३ वर्षे उलटली तरी हुडकोवासीयांच्या नावावर घरे होत नसल्याने ते हतबल झाले आहेत. नगर परिषदेने सर्व सोपस्कार पार पाडूनही तसेच सातत्याने पाठपुरावा करूनही शासन मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे वास्तव आहे.२०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत निवडणूक आचारसंहिता संपताच  हुडकोवासीयांचा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांचेही आश्वासन हवेत विरले आहे. शासनाची हुडकोची योजना शहरात १९८९ मध्ये आली. या योजनेअंतर्गत म्हाडाकडून ३७१ गुंठे जागा मिळाली. या जागेत ३७१ घरे उभारली गेली. प्रत्येकाला ६०० स्क्वे.फूट जागा, तर ३७५ स्क्वे.फुटांचे बांधकाम अशा स्वरुपाची हुडकोची रचना करण्यात आली. त्या वेळी एक घर लाभार्थ्याला २८ ते ३० हजार रुपयांना पडले. २४५ रुपये प्रतिमहिना हप्ता याप्रमाणे हप्त्याची सवलत दिली गेली. परवडेल अशा दरात घरे मिळाल्याने यातच अल्प रकमेचा हप्ता असल्याने त्या वेळी हुडकोवासीय सुखावले गेले. १९८९ ते २००५ अशा २६ वर्षांत हप्ते फेडायचे होते. २००५ मध्ये हप्ते संपले. हप्ते संपल्यानंतर घरे नावावर होतील, या आशेवर हुडकोवासीय राहिले. घरे नावावर करण्याचा विषय त्या वेळेस फारसा गांभीर्याने न घेतल्याने प्रश्न रेंगाळला. नगर परिषदेवर प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे हुडकोवासीयांच्या घरे नावावर करण्याचा विषय आला असता त्यांनी त्याबाबत सखोल माहिती घेतली. हुडको वसाहतीसाठी जी जमीन घेण्यात आली त्या जमिनीचे १९८९ च्या रेडिरेकनर दरानुसार १३ लाख रुपये दर निश्चित करण्यात आले होते. जागावाटपाच्या आदेशात ही रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते. वेळेत न भरल्यास शासन दराप्रमाणे ८ टक्के व्याज आकारण्याबाबत त्यात स्पष्ट करण्यात आले होते. ही रक्कमच शासनाकडे (जमिनीची) भरण्यात आली नसल्याचे धारिवाल यांच्या निदर्शनास आले. इतकी वर्षे रक्कम न भरल्याने २०१४ पर्यंत या जमिनीची (व्याजासह) रक्कम ५७ लाख ३० हजारांपर्यंत जाऊन पोहोचली. या माहितीनंतर धारिवाल यांनी हुडकोवासीयांची बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांना सविस्तर वृत्तांत सांगण्यात आला. सर्वांना विश्वासात घेतल्यानंतर जमिनीची रक्कम भरण्यासंदर्भात प्रत्येकाकडून २० हजार रुपये जमा करण्याचे ठरले. बहुतांशी हुडकोवासीयांनी ही रक्कम नगर परिषदेकडे जमा केली. जमा झालेली रक्कम नगर परिषदेने १० जुलै २०१४ ला शासनाकडे जमा केली. ही रक्कम भरल्यानंतर नगर परिषदेने त्याचा पाठपुरावाही सुरू ठेवला. मात्र घरे नावावर होण्याचा प्रश्न सुटला नाही.     शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे  भाजपाचे आहेत. त्यांनीही याबाबत पाठपुरावा केला. मात्र नेमके अडले कुठे हे सांगता येईना. गृहनिर्माण विभागाकडे हुडकोची फाईल प्रलंबित असून लवकरच मार्ग निघेल, असे आमदार पाचर्णे यांनी आश्वासन केले आहे. मात्र आश्वासनाचे गुऱ्हाळ फार झाले शासनाने तातडीने यावर निर्णय घेण्याची मागणी हुडकोवासीयांनी केली आहे.

टॅग्स :ShirurशिरुरHomeघरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmhadaम्हाडा