शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra HSC Result 2022 : मोठी बातमी ! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:49 IST

Maharashtra Board HSC Result Date 2022 Confirmed The 12th result will be out tomorrow : विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल.

पुणे - बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात असतानाच आता बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. आता, उद्या म्हणजे बुधवार ८ जून रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार Maharashtra Board HSC Result Date 2022 Confirmed आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता चांगलीच उत्सुकता लागली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल.

कोरोना महामारीमुळे यंदा विद्यार्थ्यांनी घरातून शिक्षण घेतले. ऑनलाईन क्लासच्या उपस्थितीत गतवर्षी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. मात्र, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे, यंदाच्या निकालाची विद्यार्थ्यांना अधिकची उत्सुकता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ ट्विट करुन बारावीच्या निकालासंदर्भात माहिती दिली आहे. ''महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल,'' असं ट्विट त्यांनी केलंय.

असा चेक करा निकाल

विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावीत्यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक कराआता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करातुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेलतुमच्या निकालाची प्रत प्रिंट काढून तुमच्याकडेच ठेवा

या वेबसाईटवर पाहा निकाल

https://msbshse.co.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थीPuneपुणे